LockDown मध्ये शेतीची कामे करता येणार की नाही? काय आहेत सरकारचे आदेश

LockDown मध्ये शेतीची कामे करता येणार की नाही? काय आहेत सरकारचे आदेश

कोरोनाने जगभर थैमान घातलं असून 150 पेक्षा जास्त देश व्हायरसच्या विळख्यात आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मार्च : कोरोनामुळे देशात लॉकडाउन सुरू आहे. 14 एप्रिलपर्यंत लोकांना घराबाहेर पडू नये असं सांगण्यात आलं आहे. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना शेतातील कामे करता येणार आहेत. सरकारने यासाठी सूट दिली आहे. केंद्रीय गृहसचिवांनी एक आदेश दिला असून लॉकडाउनच्या दरम्यान शेतकरी आणि शेतमजूरांना शेतात काम करता येणार आहे. इतकंच नाही तर कृषी औजारे भाड्यानं देणाऱ्यांनासुद्धा ही सेवा पुरवता येणार आहे.

लॉकडाउनच्या काळात रासायनिक खते, कीटकनाशके आणि बियाणांचे उत्पादन, वितरण आणि त्याची विक्री करता येणार आहे. शेतकऱ्यांना उत्पादित पीक बाजारापर्यंत घेऊन जाता येतील. तसंच सरकारी संस्थांही खरेदी करू शकतील. गहू कापणीचा हंगाम पाहता सरकारने कंम्बाइन हार्वेस्टर आणि इतर प्रकारच्या उपकरणांची इतर राज्यांमध्ये होणाऱ्या वाहतुकीलाही परवानगी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. 14 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या लॉकडाउनमुळे देशभर कर्फ्यू लागू झाला आहे. रस्त्यावरून फिरण्यास यात निर्बंध आहेत. लोकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे. फक्त अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठी यातून सूट देण्यात आली आहे.

हे वाचा : चिंताजनक! Coronavirus ची वर्तणूक बदलली? भारतात 15 दिवसांनी दिसली लक्षणं

कोरोनाने जगभर थैमान घातलं असून 150 पेक्षा जास्त देश व्हायरसच्या विळख्यात आहेत. मात्र अजुनही त्यावर औषध सापडलेलं नाही. भारतातही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आतापर्यंत देशात 724 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 66 बरे झाले असून 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा : LockDown ची ऐशीतैशी : रस्त्यावर हजारो लोकांचा जथ्था, पाहा धक्कादायक VIDEO

First published: March 27, 2020, 10:37 PM IST

ताज्या बातम्या