'तो' मृत्यू Coronavirus मुळे नाही; पाचव्या बळीबद्दल सरकारने दिलं स्पष्टीकरण

'तो' मृत्यू Coronavirus मुळे नाही; पाचव्या बळीबद्दल सरकारने दिलं स्पष्टीकरण

जयपूरमध्ये (Jaipur) कोरोनाव्हायरस (Coronavirus) झालेल्या इटालियन (Italian) पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 मार्च : भारतात (India) कोरोनाव्हायरस (Coronavirus) झालेल्या एका इटालियन (Italian) पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. मात्र हा मृत्यू कोरोनाव्हायरसमुळे झालेला नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमध्ये (Jaipur) इटलीतील नागरिकाचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू कोरोनाव्हायरसमुळे झाला, अशी बातमी देण्यात आली मात्र, हा मृत्यू कोरोनाव्हायरसमुळे झालेला नाही, त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूच्या आकड्यात समाविष्ट केलेला नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

जयपूरमध्ये कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह सापडलेल्या या इटलीच्या नागरिकावर उपचार झाले होते आणि तो पूर्णपणे बरा झाला होता. उपचारानंतर त्याचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले होते. आता त्याचा मृत्यू हा हार्ट अटॅकने झाला आहे, असं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे.

त्यामुळे भारतात कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 आहे. या चारही मृत रुग्णांचं वय 64 वर्षांपेक्षा जास्त होतं. देशात एकूण 206 जणांना कोरोनाव्हायरची लागण झालेली आहे.

देशात सर्वाधिक कोरोनाव्हायरसचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 52 आहे. मुंबई, पुण्यात आज 3 नवे रुग्ण आढळून आलेत. दरम्यान राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या शहरात बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र जीवनावश्यक गोष्टींवर परिणाम होणार नाही, असंही सरकारनं म्हटलं आहे.

हे वाचा - महानगरातील सर्व खासगी ऑफिसेस बंद राहणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

First published: March 20, 2020, 5:02 PM IST

ताज्या बातम्या