कोरोनामुक्त ग्रीन झोनमधल्या गोव्यात पुन्हा महाराष्ट्रातून घुसला विषाणू; 7 नवे रुग्ण

कोरोनामुक्त ग्रीन झोनमधल्या गोव्यात पुन्हा महाराष्ट्रातून घुसला विषाणू; 7 नवे रुग्ण

कोरोनामुक्त राज्य म्हणून मान मिळवणाऱ्या गोव्यात पुन्हा एकदा Coronavirus ने प्रवेश केला आहे. कोरोनाचे नवे सात रुग्ण गोव्यात सापडले आहेत. हे सगळे रुग्ण महाराष्ट्र आणि गुजरामधून आलेले आहेत.

  • Share this:

अनिल पाटील

गोवा, 13 मे : कोरोनामुक्त राज्य म्हणून मान मिळवणाऱ्या  गोव्यात पुन्हा एकदा Coronavirus ने प्रवेश केला आहे. कोरोनाचे नवे सात रुग्ण गोव्यात सापडले आहेत. हे सगळे रुग्ण महाराष्ट्र आणि गुजरामधून आलेले आहेत. दक्षिणेतलं एकमेव कोरोनामुक्त राज्य पुन्हा एकदा विषाणूच्या कचाट्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आता आंतरराज्य वाहतूक सुरू झाल्याने रुग्णवाढ होण्याचा धोकाही व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रीन झोन ची मान्यता मिळालेल्या गोव्यात covid-19 चे  सात नवे रुग्ण सापडल्याने आरोग्य प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. या सात रुग्णांपैकी  एक रुग्ण  गुजरातहून माल घेऊन ट्रकमधून आला होता. तो त्या ट्रकचा चालक आहे. मुंबईहून आलेल्या पाच जणांचं कुटुंबही पॉझिटिव्ह सापडलं आहे. या पाच जणांना घेऊन येणाऱ्या गाडीचा चालकही पॉझिटिव्ह सापडल्याने गोव्यात आता 7 रुग्ण पॉझिटिव्ह झाले आहेत.

तीन एप्रिल पासून गेले 39 दिवस एकही रुग्ण पॉझिटिव्ह न सापडलेल्या गोव्यात दिलासादायक चित्र होतं. मात्र आता सात रुग्ण आहेत. त्यांच्यावर मडगावच्या कोवीड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. ग्रीन झोनची मान्यता मिळाल्यानंतर राज्यअंतर्गत अनेक सुविधांच्या बाबतीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आली होता. मात्र आज नव्यानं आज रुग्ण सापडल्याने लॉकडाऊन अधिक कडक करण्यात येत आहे. लॉकडाऊन 3 अंतर्गतचे नियम आता राज्यात लागू होणार आहेत.

Indian Railway ने लॉकडाऊनमध्येही दोन दिवसात 7 लाख 90 हजार प्रवासी पोहोचले गावी

दरम्यान बुधवारी महाराष्ट्रात एका दिवसातले आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे बुधवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, राज्यभरात दिवसभरात 1495 रुग्ण नव्याने दाखल झाले. तर 54 रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वांत धक्कादायक आकडा मुंबईतून आला आहे. मुंबईत दिवसभरात 40 मृत्यू नोंदले गेले.

अन्य बातम्या

सावधान! हवामानात होणार बदल; पुढचे 4 दिवस पावसाचे

कोरोनाव्हायरसमुळे कसा होतो रुग्णांचा मृत्यू? शास्त्रज्ञांना सापडलं मोठं कारण

First published: May 13, 2020, 10:32 PM IST

ताज्या बातम्या