धक्कादायक! कोरोनाग्रस्त 60 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! कोरोनाग्रस्त 60 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

कोरोनाचं संक्रमण वाढत असल्यानं अनेक ठिकाणी 22 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

  • Share this:

बंगळुरु, 17 जुलै: कोरोनाविरुद्ध युद्ध लढताना आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय 60 वर्षीय महिलेनं घेतला. या महिलेचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे 5 वाजता या महिलेनं गळफास घेऊन आयुष्य संपवल्यानं खळबळ उडाली.

कर्नाटकातील बंगळुरु इथल्या के.सी. सामान्य रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. 60 वर्षीय महिलेनं आत्महत्या केली आहे. उत्तर बंगळुरुच्या पोलीस उपायुक्तांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. कर्नाटकात कोरोनाचं संक्रमण वाढत असल्यानं अनेक ठिकाणी 22 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

हे वाचा-धक्कादायक! स्वतःच्या चित्रावर मृत्यू दिनांक लिहून शिक्षकाने केली आत्महत्त्या

गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद झाली आहे. आज 34 हजार 956 नव्या रुग्णांची नोंद झाली. याआधी 16 जुलै रोजी 32 हजार 607 रुग्ण सापडले होते. गेल्या 24 तासांत 687 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक 22 हजार 834 रुग्ण निरोगी झाले आहेत.

हे वाचा-क्रीडा विश्वाला झटका, अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचे कोरोनामुळे निधन

27 जून ते 17 जुलै या कालावधीमध्ये उर्वरित 5 लाख नवीन प्रकरण समोर आली आहेत. कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरत असल्याची माहिती समोर आल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. केवळ 20 दिवसांमध्ये आणखीन 5 लाख लोकांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. आज कोरोनाग्रस्तांचा आकाडा 10 लाखांवर पोहोचला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 17, 2020, 12:39 PM IST

ताज्या बातम्या