कोरोनामुळे देशातल्या सर्वात लहान 14 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

कोरोनामुळे देशातल्या सर्वात लहान 14 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू

  • Share this:

जामनगर 07 एप्रिल : देशातल्या सर्वच राज्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. गुजरातमध्ये आज एका 14 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. ही गुजरातली सर्वात लहान रुग्ण होती. जामनगमधल्या के जी.जी. हॉस्पिटलमध्ये तिला भरती करण्यात आलं होतं. त्या मुलीच्या किडनी फेल झाली होती आणि मल्टी ऑर्गन फेल्युअर झालं होतं. मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मुलीच्या कुटुंबीयांना मात्र कोरोनाची लागन झाली नाही.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन कऱण्यात आलं आहे. हे लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्यानं हे थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. एका अभ्यासानुसार देशातील 30 टक्के कोरोनाचे रुग्ण हे 10 जिल्ह्यात असल्याचं समोर आलं आहे. यातील दोन तर महाराष्ट्रातच आहेत.

देशातमध्ये राज्यांची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्र, दिल्ली, केरळ या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे. सर्वाधिक वेगानं कोरोना रुग्णांची संख्या वाढणाऱ्या राज्यांत दिल्ली आघाडीवर आहे. दिल्लीत आतापर्यंतचं प्रमाण 31.7 टक्के तर आंध्र प्रदेशचं प्रमाण 20 टक्के आहेत. त्याखालोखाल 11.9 टक्के राजस्थान तर तेलंगणात 12 टक्के आहे. हेच महाराष्ट्रात 4.4 टक्के इतकं आहे. दिल्लीत तबलीगी जमात प्रकरणानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झाली.

देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्याखालोखाल तामिळनाडु आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. याशिवाय देशातील जिल्ह्यांची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्यावरून देशातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के रुग्ण हे 10 जिल्ह्यात असल्याचं समोर आलं आहे. त्या दहामध्ये महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

First published: April 7, 2020, 10:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading