सलाम तिच्या कर्तव्याला! दगडफेक झाल्यानंतरही महिला डॉक्टर पुन्हा सेवेसाठी झाली हजर

सलाम तिच्या कर्तव्याला! दगडफेक झाल्यानंतरही महिला डॉक्टर पुन्हा सेवेसाठी झाली हजर

नागरिकांकडून हल्ला झाल्यानंतरही डॉक्टरांनी देशाची सेवा करणं आणि लोकांना वाचवण्यासाठीची धडपड कमी केलेली नाही. हल्ल्यानंतर गुरुवारी डॉक्टरांनी पुन्हा कामावर रुजू होत कोरोनाशी लढा चालूच ठेवला.

  • Share this:

इंदूर, 04 एप्रिल : कोरोनाने जगभर हाहाकार माजवला आहे. जगातील अनेक देश आज कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत कोरोनाच्या तावडीतून सोडवण्यासाठी डॉक्टर आणि नर्स अहोरात्र झटत आहे. लोकांना मृत्यूपासून वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या याच डॉक्टरांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. इंदौरमध्ये टाटपट्टी आणि सिलावटपुरा इथं कोरोना संशयितांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांवर हल्ला झाला होता.

नागरिकांकडून हल्ला झाल्यानंतरही डॉक्टरांनी देशाची सेवा करणं आणि लोकांना वाचवण्यासाठीची धडपड कमी केलेली नाही. हल्ल्यानंतर गुरुवारी डॉक्टरांनी पुन्हा कामावर रुजू होत कोरोनाशी लढा चालूच ठेवला. हल्ला झालेले डॉक्टर कोरोना संशयितांची ओळख पटवून त्यांना क्वारंटाइन करत आहेत.

हे वाचा-पुणे पोलिसांनी वाचवला वृद्ध महिलेचा जीव; लॉकडाऊनमध्ये होतंय सगळ्यांकडून कौतुक

गुरुवारी महिला डॉक्टर जाकिया पुन्हा कामावर रुजू झाल्या आहेत. एवढंच नाही तर ज्या भागात हल्ला झाला तिथंच त्या पुन्हा पोहोचल्या. बुधवारी त्यांच्यावर जमावाने हल्ला केला होता. त्यांनी आजतक या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं की, आम्ही घाबरू शकत नाही. आम्हाला लोकांना संवेदनशील बनवावं लागेल आणि त्यांना आवश्यक ते उपचार करावे लागतील. कोरोनाशी लोक लढा देत आहेत. आम्हाला रुग्णांची ओळख पटवायची आहे.

भारतात आतापर्यंत कोरोनाचे 2500 पेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. तर मृतांची संख्या 70 पर्यंत पोहोचली आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 10 लाख 66 हजार 705 आहे. तर 55 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक फटका इटली आणि स्पेन या दोन देशांना बसला आहे. या देशांमध्ये कोरोनामुळे मृतांची संख्या 10 हजारांच्या वर गेली आहे.

हे वाचा-नमाज पठण रोखल्याने पाकिस्तानी पोलिसांवर जीवघेणा हल्ला, घटनेचा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2020 10:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading