लॉकडाऊन वाढणार की नाही? आज महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता

लॉकडाऊन वाढणार की नाही? आज महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता

पहिला टप्पा 24 मार्च रोजी 21 दिवसांसाठी होता. त्यानंतर 14 एप्रिल ते 3 मे असा दुसरा टप्पा तर 17 मेपर्यंत तिसरा आणि 31 मेपर्यंत चौथा टप्पा होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मे : देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड-19 चा संसर्ग टाऴण्यासाठी आतापर्यंत 4 टप्प्यांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन 31 मे रोजी संपणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुढे लॉकडाऊन वाढवण्यात येणार का? वाढवल्याच नवीन नियमावली कशी असेल? लॉकडाऊ 5.0 कसा असेल आणि किती दिवसांसाठी असेल याबाबत अनेक प्रश्नांची उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अजूनतरी शाळा, महाविद्यालयं, सार्वजनिक कार्यक्रम बंद ठेवण्यात आले आहेत. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये बरेच नियम शिथिल करण्यात आले आहेत.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये जास्त सूट दिल्यास वैज्ञानिकांनी व्यक्त केली भीती

दोन आठवडे लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, पुणे, ठाणे, इंदूर, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, सूरत आणि कोलकाता या शहरांमध्ये लॉकडाऊन कायम असू शकतो. 31 मेनंतर लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो अशा चर्चा असताना केंद्रीय गृह मंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी लॉक़डाऊनबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी गृह मंत्र्यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यानंतर काय केले जाऊ शकते, यांवर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांकडून कोणत्या क्षेत्रात सूट दिली जाऊ शकते, याबाबत सल्लेही घेण्यात आले.

हे वाचा-आणखी 15 दिवस वाढवला जाऊ शकतो Lockdown या क्षेत्रांना मिळू शकते सुट 

लॉकडाऊन कसा वाढावण्यात आला...

पहिला टप्पा 24 मार्च रोजी 21 दिवसांसाठी होता. त्यानंतर 14 एप्रिल ते 3 मे असा दुसरा टप्पा तर 17 मेपर्यंत तिसरा आणि 31 मेपर्यंत चौथा टप्पा होता. आता आणखीन दोन आठवडे वाढवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अद्यापही कोरोनावर लस मिळाली नसल्यानं संसर्गाचा धोका वाढता आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आणि नागरिकांना लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हे वाचा-कोरोनानंतरचा धक्का सावरण्यासाठी मोदींचा Action Plan, असं असेल शैक्षणिक धोरण!

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 30, 2020, 8:27 AM IST

ताज्या बातम्या