WHOच्या दाव्याने चिंता वाढली! भारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे; कोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती

WHOच्या दाव्याने चिंता वाढली! भारतासाठी पुढील 6 ते 18 महिने अत्यंत महत्त्वाचे; कोरोना संसर्गाच्या अनेक लाट येण्याची भीती

Coronavirus: कोरोनाची दुसरी लाट अद्यापही असतानाच भारताची चिंता वाढणारा दावा वैज्ञानिकांकडून करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 मे: भारतात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) अद्यापही कायम आहे. त्याच दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr Soumya Swaminathan) यांनी असा दावा केला आहे की, ज्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. भारतासाठी पुढील 6 ते 18 महिने हे खूपच महत्त्वाचे आहेत आणि या दरम्यान कोरोना संसर्गाच्या अनेक लाटा येण्याची शक्यता आहे असं वक्तव्य डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केलं आहे.

डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी पुढे म्हटलं, कोरोना संक्रमणाच्या काळात व्हायरसमधील बदल आणि नवीन व्हेरिएंट विरुद्द कोरोना प्रतिबंधक लसीच्या प्रभावाची क्षमता ही अनेक गोष्टींवर अवलंबून असेल. अपेक्षा आहे की, 2021च्या अखेरपर्यंत जगातील 30 टक्के लसीकरण पूर्ण झालेलं असेल.

भारतातील कोरोना व्हेरिएंट वेगाने पसरतोय

'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी देशातील कोरोनाची सद्यस्थिती आणि लसीकरण यावर चर्चा केली आहे. त्या म्हणाल्या, भारतातील कोरोनाचा B1.617 व्हेरिएंट हा कोरोनाचा मुख्य व्हेरिएंटच्या दुप्पट घातक आहे. आता हा व्हेरिएंट दोन वेगवेगळ्या स्ट्रेनमध्ये विभागला आहे. मात्र, आता हा किती भयंकर आणि धोकायायक आहे हे सर्व परिक्षणानंतर समोर येईल.

भारतातील लसीकरणाला गती द्यायला हवी

डॉ. स्वामीनाथन यांनी म्हटलं, भारतात उपलब्ध असलेली लस ही नव्या स्ट्रेनवर प्रभावी आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेणं खूपच आवश्यक आहे. लसीकरणानंतर सुद्धा नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. मात्र, मोठ्या धोक्यापासून नक्कीच लस बचाव करेल.

दुसऱ्या लाटेशी लढाई सुरू असताना तिसऱ्या लाटेचं सावट! वाचा कधी धडकणार Corona Third Wave?

एकूणच कोरोना प्रतिबंधक लस 100 टक्के सुरक्षा तर देत नाही मात्र, तुम्हाला मोठ्या धोक्यापासून नक्कीच वाचवू शकते. काही देशांत लसीचे दोन्ही डोस एकूण लोकसंख्येच्या 40 ते 50 टक्के नागरिकांना देण्यात आले आहेत आणि जनजीवन पुन्हा सुरळीत होत आहे. मात्र, असे अनेक देश आहेत जेथे लसीकरणाचा वेग कमी आहे. अनेकांनी तर फ्रंटलाईन वर्कर्सला आणि वृद्धांना सुद्धा लस दिलेली नाहीये. या देशांमध्ये कोरोना संसर्गाची नवीन लाट येण्याची शक्यता आहे.

भारतात वैद्यकीय सुविधा वाढवणे गरजेचे

डॉ. स्वामीनाथन यांनी म्हटलं, भारतात वैद्यकीय सुविधा वाढवण्याच्या गरजेवर भर द्यायला हवा. भारतासह अनेक देशांत कोरोना मृतकांचा आकडा कमी आहे. भारतातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणखी बळकटी देण्याची आवश्यकता आहे.

Published by: Sunil Desale
First published: May 17, 2021, 11:47 PM IST

ताज्या बातम्या