मराठी बातम्या /बातम्या /देश /Coronavirus ची दहशत कायम : तिरुपती, अयोध्या आणि आता वैष्णोदेवीतही घडला तोच किस्सा!

Coronavirus ची दहशत कायम : तिरुपती, अयोध्या आणि आता वैष्णोदेवीतही घडला तोच किस्सा!

थेट पुजाऱ्यांनाच कोरोनाचा (Covid-19) संसर्ग झाल्याचं या तीनही देवस्थानांच्या बाबतीत दिसून आलं आहे. महाराष्ट्रातही धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी होते आहे.

थेट पुजाऱ्यांनाच कोरोनाचा (Covid-19) संसर्ग झाल्याचं या तीनही देवस्थानांच्या बाबतीत दिसून आलं आहे. महाराष्ट्रातही धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी होते आहे.

थेट पुजाऱ्यांनाच कोरोनाचा (Covid-19) संसर्ग झाल्याचं या तीनही देवस्थानांच्या बाबतीत दिसून आलं आहे. महाराष्ट्रातही धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी होते आहे.

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : महाराष्ट्रात सध्या धार्मिक स्थळं उघडण्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वच धर्मांच्या पुढाऱ्यांनी आपापली धर्मस्थळं उघडण्याची मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे. शॉपिंग मॉल उघडतात, अन्य सगळे व्यवसाय सुरू होतात तर मग मंदिरंच बंद का, असा सवाल करत राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरेंकडे मंदिरं उघडण्याची मागणी केली. पण मंदिरं उघडल्यानंतर काय होतं हे सांगणारी तीन ढळढळीत उदाहरणं आहेत. सुरुवातीला तिरुपती, मग अयोध्या आणि आता वैष्णोदेवी मंदिर भक्तांसाठी उघडल्यानंतर या तिन्ही धर्मस्थळांवर Corona चा फैलाव वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. थेट पुजाऱ्यांनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचं या तीनही देवस्थानांच्या बाबतीत दिसून आलं आहे.

तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर तिरुपती इथलं जगप्रसिद्ध तिरुमाला बालाजी देवस्थान 11 जून रोजी उघडण्यात आलं. सुरुवातीला तिरुपतीमध्ये आटोक्यात असलेला कोरोना संसर्ग मंदिर उघडल्यानंतर भराभर वाढला. सुरुवातीलाच कोरोनारुग्ण वाढत असल्याचं लक्षात आलं. पण मंदिर बंद केलं गेलं नाही. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार तिरुपती देवस्थानच्या 743 कर्मचाऱ्यांनाच कोरोनाने घेरलं आहे. त्यात काही पुजारीसुद्धा आहेत. तिरुमाला बालाजी मंदिरातल्या 43 वर्षीय पुजाऱ्यांचा तर या विषाणूने बळी घेतला. त्यापूर्वी देवस्थानात पूर्वी प्रमुख पुजारी म्हणून कार्यरत असणाऱ्यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 300 हून अधिक कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

हीच कथा अयोध्येच्या राम मंदिर कोनशीला कार्यक्रमाच्या वेळी पाहायला मिळाली. अयोध्येला रामजन्मभूमीवर उभ्या राहणाऱ्या मंदिराच्या भूमिपूजनानंतर लगेच राम मंदिर न्यासाचे प्रमुख कोरोनाग्रस्त झाल्याचं उघड झालं. हे प्रमुख ट्रस्टी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर भूमिपूजन सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित होते. अयोध्येच्या मंदिर परिसरात लगबग वाढली त्यानंतर पुजारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक कोरोनाग्रस्त होत असल्याच्या बातम्या सुरू झाल्या.

हे वाचा - राज्यात कोरोनामुळे उच्चांकी 424 जणांचा मृत्यू, आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या

आता दोन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या जम्मूच्या वैष्णोदेवी यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा तीच गोष्ट लक्षात आली आहे. वैष्णोदेवी देवस्थानात कोरोना विषाणू आता शिरला आहे. मंदिराच्या तीन पुजाऱ्यांसह 22 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. अन्य कोरोनाग्रस्तांमध्ये तिथे बंदोबस्तावर असलेले 4 पोलीस कर्मचारी आणि माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाचे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक आहेत. आता मंदिरात येणाऱ्या शेकडो भाविकांना किती मोठा धोका निर्माण झाला आहे, हे लक्षात येईल.

राज्यात मंदिरं आणि प्रार्थनास्थळं उघडणार का? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

राज ठाकरे यांनी मंदिरं उघडण्याची मागणी केली, त्याच दिवशी ठाकरे सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी मशिदी खुल्या करण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं. खुद्द मुख्यमंत्रीच धार्मिक स्थळं खुली करण्याविषयी निर्णय घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र अद्याप या विषयावर खुलासा केलेला नाही.

First published:
top videos

    Tags: Coronavirus