मुंबई, 22 जुलै: कोरोनावर जगभरात वॅक्सीन तयार करण्याचं काम सुरू आहे. अॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड तयार केलेल्या लशीची मानवी चाचणी यशस्वीरित्या पार पडली. ही लसीच्या संशोधनात पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचाही मोलाचा वाटा आहे. या लसीच्या उत्पादनात ही कंपनी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. सध्या या लसीचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती उपलब्ध होईल अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कंपनीकडून देण्यात आली आहे.
एकूण लसींच्या उत्पादनातील 50 टक्के उत्पादन भारतीयांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी CNN-News 18 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितली विशेष म्हणजे, भारतीयांना ही लस खरेदी करता येणार नाही. सरकार या लसीचे पैसे देईल आणि लसीकरण मोहिमेअंतर्गत ती सामान्यांना दिली जाईल, असंही पुनावाला यांनी सांगितलं आहे.
हे वाचा-18 कोटी भारतीयांमध्ये कोरोनाविरोधी अँटिबॉडीज; सर्व्हेत समोर आली धक्कादायक माहिती
भारतात कोरोनाच्या लसीची चाचणी यशस्वी झाली तर मार्च 2021 पर्यंत जवळपास 30 ते 40 टक्के डोस तयार करण्यात येईल. त्यामुळे मार्च 2021 पर्यंत ही लस भारतीयांसाठी उपलब्ध होऊ शकेल. भारतात लसीची चाचणी झाल्यानंतर त्याचे परिणाम चांगले आले तर मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्यात येईल अशी माहितीही पुनावाला यांना दिली आहे.
हे वाचा-ठाकरे सरकारमधले आणखी एक मंत्री COVID-19 पॉझिटिव्ह
या लशीच्या तिसऱ्या मानवी चाचणीसाठी टप्प्यात मुंबई-पुण्यातील रुग्णालयांमधील साधारण 5000 रुग्णांचा सामावेश असणार आहे. लस दिल्यानंतर साधारण दोन ते तीन महिने निरीक्षण करण्यात येईल आणि त्यानंतर अंतिम निकाल येईल अशी माहिती देण्यात आली आहे.
कोरोनाच्या लसीचे दुष्पणरिणामही सध्या बहुतेक इतर लसींच्या दुष्परिणामांसारखेच आहेत. ताप, डोकेदुखी आणि काहींना सूजही येण्याची शक्यता आहे. एक सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या लसीचे अजूनपर्यंत कोणतेही गंभीर दुष्परिणाम निरीक्षणात आढळून आले नाहीत. सर्व चाचण्या आणि निरीक्षणं पूर्ण करून नोव्हेंबरपर्यंत ही लस बाजारात आणण्याचा कंपनीचा कयास असल्याची माहिती पुनावाला यांनी मुलाखतीमध्ये दिली.