• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • भारतातल्या मुलांसाठी आणखी एक लस, जॉन्सन अँड जॉन्सनने ट्रायलसाठी मागितली परवानगी

भारतातल्या मुलांसाठी आणखी एक लस, जॉन्सन अँड जॉन्सनने ट्रायलसाठी मागितली परवानगी

Coronavirus Vaccination: भारतात कोरोना व्हायरसचं (Coronavirus) वाढत संक्रमण आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या (Third Wave) पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी समोर आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 ऑगस्ट: भारतात कोरोना व्हायरसचं (Coronavirus) वाढत संक्रमण आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या (Third Wave) पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी समोर आली आहे. लवकरच लहान मुलांसाठी लस (Corona Vaccine for Children)देशात येऊ शकते. अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने (Johnson & Johnson) भारतातील 12-17 वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीच्या ट्रायलसाठी परवानगी मागितली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने जारी केलेल्या एका संक्षिप्त निवेदनात असं म्हटलं आहे की, कंपनीनं मंगळवारी अर्ज सादर केला आणि कोरोना लसीची सुविधा जगात एकसमान करण्यासाठी ते वचनबद्ध आहे. अमेरिकन फार्मा कंपनीने सांगितले की, मुलांसाठी लसीची गरज लक्षात घेऊन, 17 ऑगस्ट रोजी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) कडे अर्ज पाठवले असून 12-17 वर्षे वयाच्या मुलांसाठी लसीच्या ट्रायलसाठी परवानगी मागितली आहे. याआधी याच महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकन फॉर्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस असलेल्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली. भारतात मंजूर होणारी ही पाचवी आणि पहिली सिंगल डोस लस आहे. भारतीय सैन्याचं यश, दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा जॉन्सन अँड जॉन्सन वगळता भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजूर झालेल्या पाच लसींमध्ये सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅसीन, रशियाची स्पुतनिक व्ही आणि मॉडर्ना लशींचा समावेश आहे. कोव्हॅसीन, Covishield, मॉडर्ना आणि Sputnik-V या चारही डबल-डोस लस आहेत, तर जॉन्सन अँड जॉन्सनची लस ही सिंगल-डोस लस आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: