अरे देवा! लग्नासाठी तब्बल 850 किमी सायकलने पोहोचला नवरदेव पण...

अरे देवा! लग्नासाठी तब्बल 850 किमी सायकलने पोहोचला नवरदेव पण...

1 एप्रिल रोजी लुधियानाहून उत्तर प्रदेशला जाण्यासाठी नवरदेव सायकलवरून निघाला होता.

  • Share this:

गोंडा, 18 एप्रिल : देशभऱात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे. तर दुसरीकडे सोशल डिस्टन्सिंग राखून लग्न समारंभ पार पडत आहेत. कधी फेसबुकवरून तर कधी व्हिडीओ कॉलिंवर लग्न सोहळे होत आहेत. या सगळ्यात एक थक्क करणारी घटना समोर आली आहे. लग्नासाठी नवरदेव सायकलवरून चक्क 850 किलोमीटरचा प्रवास करून आल्याचा प्रकार घडला. 1 एप्रिलला नवरदेव सायकलवरून लग्नासाठी निघाले. मजल दरमजल करण नवरदेव उत्तर प्रदेशात 11 मित्रांसोबत पोहोचले खरे मात्र पोलिसांनी त्यांना तातडीनं क्वारंटाइन केलं. 15 एप्रिल रोजी विवाह सोहळा पार पडणार होता.

हे वाचा-'मम्मी माझी काळजी करू नको'; 5 वर्षांच्या मुलाने कोरोना वॉरिअर आईला दिलं बळ

नवरदेवासोबत नेमकं काय घडलं

लुधियानाच्या तरुणाचं उत्तर प्रदेशातील गोंडा इथल्या मुलीसोबत विवाह सोहळा ठरला होता. लॉकडाऊनमुळे कोणतंच वाहन उपलब्ध नव्हतं. या नवरदेवानं आपल्या 11 मित्रांसोबत सायकलवरून उत्तर प्रदेशला जायचं ठरवलं त्यानुसार 1 एप्रिलला सर्वजण निघाले. सोनू कुमार चौहान नावाचा नवरदेव हा पिपरा रसूल इथला रहिवासी आहे. तो आणि त्याचे मित्र तब्बल 850 किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करून 6 एप्रिलला उत्तर प्रदेशात पोहोचले. तिथल्या पोलिसांनी त्यांना तत्काळ क्वारंटाइन केलं. घरी सुखरुप पोहोचलो असतो तर नियम पाळून लग्न केलं असतं असं नवरदेवाचं म्हणणं आहे. मात्र पोलिसांनी क्वारंटाइन केल्यामुळे आता लग्नच होऊ शकलं नाही याचं खंत व्यक्त केली आहे.

उत्तर प्रदेशात लॉकडाऊनचे नियम योगी आदित्यनाथ यांनी कडक केले आहेत. कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी कठोर पालन केलं जात आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 894 वर पोहोचली आहे. त्यापैकी 504 तबलिगी जमातचे लोग आहेत. तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा-पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यात थेट चर्चा व्हावी, शिवसेनेचा भाजपला सल्ला

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 18, 2020, 10:55 AM IST

ताज्या बातम्या