Home /News /national /

'या' कारणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 एप्रिल हा दिवस निवडला?

'या' कारणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 एप्रिल हा दिवस निवडला?

5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटं आपल्या दरवाजात किंवा बालकणीध्ये दिवे लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

    मुंबई, 03 एप्रिल : कोरोनाचं थैमान सुरू आहे. या कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला आवाहन केलं आहे. 5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटं आपल्या दरवाजात किंवा बालकणीध्ये दिवे लावण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या लॉकडाऊनच्या 14 दिवसांमध्ये 05 एप्रिल हाच दिवस का निवडला असावा असा प्रश्न पडला असेल. 5 एप्रिल या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. या घटना काय आहेत आणि हाच दिवस का निवडला याचं महत्त्व काय आहे जाणून घेऊया. राष्ट्रपिता महत्मा गांधीजी यांची दांडी यात्रा याच दिवशी त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. या दांडी यात्रेला खास महत्त्व आहे. हे आंदोलन राजकारणातील अहिंसक आंदोलनाचा एक महत्त्वपूर्ण प्रयोग होता. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे बाबू जगजीवन राम यांचा जन्म. 5 एप्रिल 1908 रोजी बाबू जगजीवन राम यांचा जन्म झाला होता. त्यांनी 50 वर्ष संसदेत राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. 1936 ते 1986 साली ते संसदेत होते. त्यांनी वंचितांसाठी अनेक प्रयत्न केले होते. तिसरी महत्त्वाची घटना भारतीय नौदलासाठी महत्त्वपूर्ण दिवस. या दिवशी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. 1919 साली भारतीय मर्चेंट शिपिंगची सुरुवात झाली होती. दुसरं म्हणजे यावेळी इंग्रजांनी आपल्या सागरी तटांवर कब्जा केला होता. त्याचवेळी मुंबईला बॉम्बे हे नाव मिळालं. 1979मध्ये देशातील पहिलं नौदल संग्रहालय उभारण्यात आलं होतं. हे वाचा-लॉकडाऊनमुळे वडिलांचे अंत्यसंस्कारही नाही करू शकली ही अभिनेत्री पंतप्रधान मोदी जनतेसोबत संवाद साधताना काय म्हणाले... मोदी पुढे म्हणाले की, भारताने दाखवलेलं धैर्य अनेक देशांसाठी आदर्श आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी मोठं सहाकार्य केलं. हा सरकार आणि लोकांचा सामूहिक लढा आहे. तुम्ही कोणीही एकटे नसून आपण सगळे एकत्र आहोत. जनतेने 22 मार्चला जनता कर्फ्यूचं पालन केलं. त्यासाठीही मोदींनी पुन्हा एकदा जनतेचे आभार मानले आहेत. '5 एप्रिलला सगळ्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी एकत्र यायचं आहे. 130 करोड देशवासियांच्या शक्तीचं प्रदर्शन करायचं आहे. मला रात्री 9 वाजता सगळ्यांचे 9 मिनिट हवं आहेत. यावेळी आपण घरातील सगळ्या लाईट बंद करू आणि सगळे घराच्या दारात उभे राहून मेनबत्ती, दिवा, मोबाईलची लाईट लावू. या वेळी घरातील सर्व लाईट बंद असतील. तेव्हा प्रकाशाच्या या महाशक्तीचा जागर होईल आणि सगळ्यांची एकता दिसेल' असं आवाहन मोदींनी जनतेला केलं आहे. हे वाचा-तबलिगी समाजातील कोरोना रुग्णांचा कहर, नर्ससमोरच बदलले कपडे
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या