Home /News /national /

पोलीस ठाण्याचं झालं भोजनालय, खाकी वर्दीने गरजूंसाठी तयार केलं जेवण

पोलीस ठाण्याचं झालं भोजनालय, खाकी वर्दीने गरजूंसाठी तयार केलं जेवण

अनेकांच्या खाण्या-पिण्याची भ्रांत असतानाच त्यांच्या मदतीला पोलीस धावून आल्याचं पाहायला मिळत आहे.

    मुंबई, 02 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभरासह भारतात ही हाहाकार पसरला आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 900 च्या आसपास पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा राज्यात आढले आहेत. देशभरात कोरोनग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना पाहयला मिळत आहेत. हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांचे व्यवसाय आणि रोजगार ठप्प झाले आहेत. अनेकांच्या खाण्या-पिण्याची भ्रांत असतानाच त्यांच्या मदतीला पोलीस धावून आल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांना लाठीनं शिक्षा सुनावणाऱ्या पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन घडत आहे. गरीब, मजूर, हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशांना पोलीसांनी जेवणाच्या रुपानं मदतीचा हात दिला आहे. सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये महिला पोलीस जेवण तयार करत आहेत. रायबरेली इथला हा फोटो असल्याचा दावा केला जात आहे. पोलीस ठाण्यातच महिलांनी जेवण तयार करायला सुरुवात केली. यामध्ये महिला पोलिसांनी पुढाकार घेऊन मजूर आणि उपासमार होणाऱ्या नागरिकांसाठी जेवण तयार केलं आहे. या महिला आपली ड्युटी करून त्यानंतर जेवण तयार करतात आणि गरीब, मजूर, कामगार वर्गापर्यंत हे जेवण पोहोचवतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुणीही उपाशी झोपू नये असे आदेश दिले होते. त्यामुळे गरजू, श्रमिकांची भूक भागवण्याचं काम पोलिसांनी हाती घेतलं आहे. हे वाचा-हे राम! मंत्र्यांनीच लॉकडाउनचं केलं उल्लंघन, रामनवमी सोहळ्याला पोहोचले मंदिरात देशभरात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 1 हजार 965 वर पोहचली आहे. कोरोनामुळं आतापर्यंत 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढला आहे. एका दिवसात तब्बल 328 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, आतापर्यंत 151 रुग्ण निरोगी झाले आहे. हे वाचा-सावध राहा! कोरोनाला रोखण्यासाठी PM मोदींनी केल्या या 11 सूचना
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Symptoms of coronavirus, Up Police, Uttar pradesh

    पुढील बातम्या