Corona Update : 24 तासांत 693 कोरोनारुग्ण; देशात कोरोनाबळींची संख्या 109

Corona Update : 24 तासांत 693 कोरोनारुग्ण; देशात कोरोनाबळींची संख्या 109

86 टक्के लोकांचा मृत्यू कोरोनाव्हायरसबरोबर इतर कुठला मोठा आजार असल्यामुळे झाला आहे, असंही आकडेवारी देत मंत्रालयाने स्पष्ट केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 एप्रिल : देशात लॉकडाउन असूनही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 693 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. काल दिवसभरात 30 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. आज आत्तापर्यंत 2 मृत्यू नोंदले गेले आहेत. 24 तासांतल्या या 32 मृत्यूंमुळे भारतात कोरोनाबळींची संख्यासुद्धा 109 वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढलेला दिसतो. पंतप्रधान मोदी आणि मंत्रिमंडळाचीही कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाविषयी एक बैठक झाली. त्याबद्दलही अग्रवाल यांनी माहिती दिली. कौन्सिल ऑफ मिनिस्टर्सच्या बैठकीत पुढे काय उपाय योजायचे यावर चर्चा झाली. क्वारंटाइन विभाग, कुठल्या लक्षणांसाठी क्वारंटाइन विभागात दाखल करून घ्यायचं याविषयीचे नियम याविषयी बैठकीत चर्चा झाल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.

वाचा - 'मृत्यूंची संख्या वाढत आहे...आता तरी गांभीर्य ओळखा', अजित पवारांचं आवाहन

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी पाहता ज्येष्ठ नागरिकांच्या जीवाला या विषाणूचा धोका जास्त आहे, हे स्पष्ट आहे. भारतात 63 टक्के कोरोनाबळींचं वय 60 पेक्षा अधिक होतं. पण त्याखालोखाल 40 ते 60 वयोगटालाही मोठा धोका आहे, असं आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसतं. 30 टक्के मृत्यू या वयोगटातल्या कोरोनाग्रस्तांचे झाले आहेत. 86 टक्के लोकांचा मृत्यू कोरोनाव्हायरसबरोबर इतर कुठला मोठा आजार असल्यामुळे झाला आहे, असंही आकडेवारी देत मंत्रालयाने स्पष्ट केलं.

कोरोनाव्हायरस मृत्यूचं प्रमाण

एकूण मृत्यूंपैकी टक्केवारी - वयोगट

63% 60 पेक्षा अधिक

30% 40-60

7% 40 पेक्षा कमी वय

तबलिगी जम्मातमुळे पसरला संसर्ग

दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये भरलेल्या तबलिगी जम्मातच्या मेळाव्यामुळे देशभर मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरला. तबलिगींमुळे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 1445 वर पोहोचली आहे. या मेळाव्याला देशभरातून लोक आले होते आणि आता अनेक जिल्ह्यांमध्ये ते संसर्ग घेऊन गेले आहेत.

लॉकडाऊन संपल्यानंतरही बंदी राहणार कायम, हा आहे सरकारचा पुढचा प्लान

First published: April 6, 2020, 4:49 PM IST

ताज्या बातम्या