मराठी बातम्या /बातम्या /देश /

Coronavirus: बंगळुरूतील एकाच शाळेतील 60 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग

Coronavirus: बंगळुरूतील एकाच शाळेतील 60 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग

Coronavirus: बंगळुरूतील एकाच शाळेतील 60 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग (प्रातिनिधिक फोटो)

Coronavirus: बंगळुरूतील एकाच शाळेतील 60 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग (प्रातिनिधिक फोटो)

Coronavirus: कोरोनाचा उद्रेक अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे.

  • Published by:  Sunil Desale

बंगळुरू, 29 सप्टेंबर : कोरोना (Corona) बाधितांची संख्या कमी होत असल्याचं पाहून देशातील विविध राज्यांनी शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, त्याच दरम्यान बंगळुरू (Bengaluru) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंगळुरूतील एका बोर्डिंग स्कूलमधील 60 विद्यार्थ्यांना एकाच वेळी कोरोनाचा संसर्ग (60 students tests positive for covid19) झाला आहे. एकाचवेळी 60 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे.

बंगळुरूतील या बोर्डिंग स्कूलमधील (Bengaluru boarding school) एकूण 480 विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 60 विद्यार्थ्यांचे कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 60 विद्यार्थ्यांपैकी केवळ दोनच विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून येत आहेत तर इतर 58 विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसत नाहीयेत.

विद्यार्थ्यांसोबत शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यापैकी कुणालाही कोरनोाचा संसर्ग झालेला नाहीये. या शाळेत काम करणाऱ्या एकूण स्टाफपैकी 22 शिक्षक आणि इतर 35 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक लसही घेतलेली आहे.

परीक्षांचा घोळ सुरूच; आरोग्य विभाग आणि शिक्षक पात्रता परीक्षा एकाच दिवशी

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एक महिन्यापासून हे विद्यार्थी बोर्डिंग स्कूलमध्ये राहत होते. यापैकी 14 विद्यारर्थी हे तमिळनाडू येथील आहेत तर 46 विद्यार्थी हे कर्नाटक राज्यातील विविध भागांत राहणारे आहेत. हे सर्वच्या सर्व 60 विद्यार्थी 11वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी बेल्लारी येथून आला होता आणि त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. त्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली.

जम्मूमधील 32 विद्यार्थ्यांना कोरोना

दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील काही विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील एका खासगी शाळेतील 32 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं निदान झालं. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर प्रशासनाने दहावी आणि बारावीसाठी शाळा सुरू करायला परवानगी दिली होती. पण हा निर्णय आता महागात पडेल की काय असंच वाटतं आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार शाळेत येणाऱ्या मुलांची अँटिजेन टेस्ट करावी, असे निर्देश प्रशासनाने दिले होते आणि या टेस्टमध्येच मुलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

महाराष्ट्रात शाळा होणार सुरू

महाराष्ट्रानेही शाळा सुरू करायला ग्रीन सिग्नल दिला आहे. येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

First published:

Tags: Bengaluru, Coronavirus, School