भारतात कोरोनाचा कहर! 24 तासांत 32 जणांचा मृत्यू तर 639 जण पॉझिटिव्ह, रुग्णाची संख्या 4 हजार पार

भारतात कोरोनाचा कहर! 24 तासांत 32 जणांचा मृत्यू तर 639 जण पॉझिटिव्ह, रुग्णाची संख्या 4 हजार पार

रविवारी देशभरातून 9 हजार 3,69 लोकांच्या रक्ताचे नमुने कोरोनाच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 295हून अधिक रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : भारतात कोरोनामुळे आता भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. दिवसेंदिवस हा आकडा झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 4 हजारवर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहे. मात्र तरीही अनेक भागांमध्ये लॉकडाऊन आणि कोरोनाचं गांभीर्य नागरिकांना लक्षात न आल्यानं हा धोका वाढताना दिसत आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनामुऴे 109 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी देशभरातून 9 हजार 3,69 लोकांच्या रक्ताचे नमुने कोरोनाच्या चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 295हून अधिक रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत 89 हजार 534 लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आल्यानंतर कोरोनाग्रस्तांची भारतातील संख्या 4 हजार 67 असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंतही ही आकडेवारी धक्कादायकच आहे. कोरोनाचा कहर थांबण्याच नाव घेत नाही. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 4 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 109 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करण्यात केवळ 232 रुग्ण यशस्वी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मागच्या 24 तासांत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे.

हे वाचा-आता प्राण्यांमध्येही पसरणार कोरोना? न्यूयॉर्कमध्ये वाघिणीनिघाली पॉझिटिव्ह

भोपाळमध्ये कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 62 वर्षी वृद्ध व्यक्ती कोरोनाविरुद्धची लढाई हरली असून उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. भोपाळमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात सर्वात जास्त धोका हा मुंबई-पुण्यासह महाराष्ट्र त्यानंतर केरळ, तेलंगणा राज्यांना आहे. मुंबईत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 433 इतकी झाली आहे. आतापर्यंत मुंबईत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातील आकडा 650हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस वाढणारे आकडे हे चिंता व्यक्त करणारे आहेत. प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सतर्क आणि घरी राहण्याचं आवाहन करत आहे.

हे वाचा-तबलिगींना घरी बोलावून पाजला चहा, आता 55 जण पोहोचले रुग्णालयात!

First published: April 6, 2020, 9:52 AM IST

ताज्या बातम्या