Home /News /national /

अनलॉक-1 मध्ये देशात कोरोनाचा विस्फोट! 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद

अनलॉक-1 मध्ये देशात कोरोनाचा विस्फोट! 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी 15 हजारांच्या आसपास गेला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 14 हजार 933 नवीन रुग्ण आढळून आले.

    नवी दिल्ली, 23 जून : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी 15 हजारांच्या आसपास गेला आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 14 हजार 933 नवीन रुग्ण आढळून आले. तर, 312 जणांचा मृत्यू झाला. यासह भारतातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 40 हजार 215 झाला आहे. देशात सध्या 1 लाख 78 हजार 014 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 2 लाख 48 हजार 190 रुग्ण निरोगी झाले आहे. आतापर्यंत देशात 14 हजार 011 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट वाढून आता 56.37% झाला आहे. देशातल सर्वात जास्त सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात आहे. राज्यात 61 हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर दिल्ली, तामिळनाडू, गुजरात आणि पश्चिम बंगाल याचा क्रमांक लागतो. राज्यांची आकडेवारी कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषध कोरोनिल तयार कोरोनासारख्या जीवघेण्या साथीच्या रोगावर जगभरात उपचार करण्यासाठी असंख्य प्रयत्न सुरू आहेत, परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजली मंगळवारी कोरोनावर आधारित कोरोनाचं पहिलं आयुर्वेदिक औषधं 'कोरोनिल' जगासमोर आणणार आहे. कोरोनाशी लढा देणाऱ्यांसाठी ही बातमी कदाचित सर्वात उपयुक्त आहे. आचार्य बालकृष्ण हे आज दुपारी 12 वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध 'कोरोनिल' लॉन्च करणार आहेत. बाबा रामदेवही यावेळी उपस्थित राहणार आहेत. संकलन-प्रियांका गावडे.
    First published:

    Tags: Corona, Corona virus, Corona virus in india

    पुढील बातम्या