Coronavirus Update : पंतप्रधान मोदी साधणार उद्या जनतेशी संवाद

Coronavirus Update : पंतप्रधान मोदी साधणार उद्या जनतेशी संवाद

  • Share this:

18 मार्च : Corona virus Update :जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या भारतात वाढत चालली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी याबद्दल आढावा घेतल्यानंतर उद्या जनतेशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी उद्या गुरुवारी संध्याकाळी जनतेला उद्देशून भाषण करणार आहे. यावेळी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

दरम्यान देशभरात कोरोना व्हायरसमुळे मृतांचा आकडा ३ वर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. त्यामुळे राज्यात लाॅकडाउन परिस्थिती निर्माण झाली आहे.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ज्या नागरिकांना होम क्वॉरंटाईन सांगितले आहे त्यांनी स्वत:हूनच घरी राहून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घ्यावी. परिसरात किंवा इतरत्र फिरू नये. अशा व्यक्तींवर शासनाचे लक्ष असून होम क्वॉरंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती जर बाहेर फिरताना आढळली तर तिला सक्तीने रुग्णालयात भरती करण्यात येईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

जनतेने जीवनावश्यक वस्तूंचा, अन्नधान्य, औषधी यांचा साठा करू नये. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व सुरळीत असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी व्यापारी साठेबाजी करीत असेल किंवा औषधांच्या, मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा लावत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशीही माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

कोरोनाला रोखण्यााठी सरकारने केले मोठे बदल

1. राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील.

2. रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

3. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील. तसेच प्रवाशी अंतराने बसावेत यासाठी तशा सूचना प्रवाशांना देण्यात येतील. शहरांमध्ये बसेसची संख्या वाढविण्यासाठी पर्यायी बसेसची व्यवस्था करण्यात येईल.

First published: March 18, 2020, 11:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या