वाचा-सर्वांपर्यंत कोरोना लस पोहोचवायची असेल तर हे करा - उद्योजिकेचा अभिनव उपाय अहमदाबादमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं लक्षात आल्यावर रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अहमदाबादमध्ये कोरोनाचा(Covid-19) मुकाबला करण्यासाठी 300 डॉक्टर्स आणि मेडिकलच्या 300 विद्यार्थ्यांना सज्ज राहण्यास सांगण्यात आलं आहे. त्याच बरोबर 20 रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. शहरातल्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समधले बेड्स वाढविण्यात आले आहेत. शहरात सध्या 2600 बेड्स खाली आहेत. लोकांनी नियमांचं सक्तीने पालन करावं असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. पुढच्या आदेशापर्यंत हा कर्फ्यू कायम राहणार असल्याचंही प्रशासनाने म्हटलं आहे. अहमदाबाद हे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट झालं होतं. दिवाळीची गर्दी ओसरल्यानंतर आता रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाचा-तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार Corona Vaccine? लशीचा गुण कितपत? लशीबद्दल सर्व काही.. महाराष्ट्रातही लागू होणार का पुन्हा Lockdown? महाराष्ट्रातही दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एका लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने पुन्हा लॉकडाऊन लावण्यासंदर्भातली कुठलीही घोषणा केलेली नाही किंवा तसे संकेतही दिलेले नाहीत. उलट महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. पण दिवाळीपूर्वीच्या गर्दीमुळे शहरात वाढलेला कोरोनाचा धोका कसा हाताळायचा याबाबत काही माहिती सरकारने दिलेली नाही.अहमदाबाद : आज रात्री 9 पासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत शहरात कर्फ्यू लागू केला जाणार आहे. याआधी दुकानाबाहेर लोकांची तोबा गर्दी. pic.twitter.com/KD4rRku8cH
— News18Lokmat (@News18lokmat) November 20, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus