Home /News /national /

मोहन भागवतांनी दिला कोरोनाशी लढण्याचा मंत्र, म्हणाले...

मोहन भागवतांनी दिला कोरोनाशी लढण्याचा मंत्र, म्हणाले...

Nagpur: Rashtriya Swaysevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat addresses during the inaugural function of 7th International Principal's Education Conference (IPEC) 2019, in Nagpur, Maharashtra, Tuesday, Nov. 19, 2019. (PTI Photo)(PTI11_19_2019_000112B)

Nagpur: Rashtriya Swaysevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat addresses during the inaugural function of 7th International Principal's Education Conference (IPEC) 2019, in Nagpur, Maharashtra, Tuesday, Nov. 19, 2019. (PTI Photo)(PTI11_19_2019_000112B)

कोरोना व्हायरसविरोधातील या लढ्यात केंद्र आणि राज्य सरकारची मदत करण्यासाठी संघाचे कार्यकर्ते सज्ज आहे.

    नवी दिल्ली, 25  मार्च : कोरोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मोदी सरकारने संपूर्ण देशभरात लॉकडाउनची घोषणा केली आहे. आता राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मदतीसाठी आवाहन केलं आहे. 'कोरोना व्हायरसविरोधातील या लढ्यात केंद्र आणि राज्य सरकारची मदत करण्यासाठी संघाचे कार्यकर्ते सज्ज आहे. लोकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी आम्ही सगळे कटीबद्ध आहोत. पोलीस आणि प्रशासनाने यावर उपाय योजना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. सरकारने दिलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे', असं मोहन भागवत म्हणाले. हेही वाचा - PM मोदींचं एक भाषण आणि जयंत पाटलांनी सांगितले 5 दुष्परिणाम, म्हणाले... 'या संघर्षमय वातावरणामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांनी प्रशासनाने केलेल्या नियमाची अंमलबजावणी करणे गरजेचं आहे. औषध आणि अन्य इतर गरजेच्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. या युद्धाची सर्वात मोठी गोष्ट सोशल डिस्टेंसिंग (Social distancing) असून समाजातील प्रत्येकांची ही सामूहिक जबाबदारी आहे. यामुळे कोरोनावर आपल्याला विजय मिळवता येईल, या युद्धात आपण सर्व एकत्र येऊन लढू', असं मतही त्यांनी व्यक्त केलं. हेही वाचा -पुण्याचा तरुण दुबई विमानतळावर अडकला, झोप लागल्यामुळे सुटलं शेवटचं विमान दरम्यान, कोरोनामुळे भारतात जवळपास 500 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे कोरोनानं भारतात 11 बळी घेतला आहे. तामिळनाडूमधील राजाजी रुग्णालयात 54 वर्षांच्या व्यक्तीवर कोरोना व्हायरसचे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तमिळनाडूचे आरोग्य मंत्री सी विजयाभास्कर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. या वर्षीय व्यक्तीला डायबेटीस होता. त्यामुळे तो उपचाराला योग्य प्रतिसाद देत नव्हता अशी माहिती मिळत आहे. कोरोनाचा विळखा 100 हून अधिक देशांना बसला आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या