सॅनिटायझर वापरण्याआधी हे वाचा! अपघातानंतर डॉक्टरांनी दिला सल्ला

सॅनिटायझर वापरण्याआधी हे वाचा! अपघातानंतर डॉक्टरांनी दिला सल्ला

सॅनिटायझर काळजीपूर्वक वापरलं नाही, तर जिवावर बेतू शकतं, याचा अनुभव हरियाणातल्या एका व्यक्तीला आला. डॉक्टरांनी सॅनिटायझरच्या वापराबद्दल सल्ला दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मार्च : कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण होऊ नये, यासाठी हात स्वच्छ (hand cleaning) ठेवण्याचा सल्ला दिला जातो आहे. सर्वाधिक संसर्गाचा धोका हातामुळेच आहे, असंही तज्ज्ञ सांगत आहेत. वारंवार हात धुवा आणि सॅनिटायझरने निर्जंतुक करा, असंही सांगितलं जात आहे. पण हँड सॅनिटायझरचा वापर जपूनच करायला हवा. अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर काळजीपूर्वक वापरलं नाही, तर जिवावर बेतू शकतं, याचा अनुभव हरियाणातल्या एका व्यक्तीला आला.

गॅसच्या जवळ उभा राहून तो हँड सॅनिटायझर वापरत होता. अल्कोहोल ज्वालाग्रही आहे. त्यामुळे अपघात होऊन ही व्यक्ती 35% भाजली आहे. या 44 वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना हरियाणातल्या रेवडीमध्ये घडली.

ही व्यक्ती स्वयंपाकाच्या गॅसजवळ सॅनिटायझरचा वापर करत होती. त्यावेळी सॅनिटायझर त्याच्या कपड्यांवर सांडलं. त्यानं पेट घेतला आणि या आगीत होरपळून ही व्यक्ती जखमी झाली. 35 टक्के भाजल्याने त्यांना दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.

या घटनेची दखल घेऊन डॉक्टरांनी हँड सॅनिटायझर वापरताना काळजी घ्यायचं आवाहन केलं आहे. सॅनिटायझरचा वापर गॅसजवळ किंवा आगीजवळ करू नये, असा सल्ला दिला आहे.

हरियाणात सॅनिटायझरमुळे आग लागून अपघात झाल्यामुळे डॉक्टरांनी हँड सॅनिटायझर वापरण्यासंबंधी सल्ला दिला आहे.

Fact check - भरपूर पाणी प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा नाश होतो?

सॅनिटायझरमध्ये एथिल अल्कोहोलचं प्रमाण 62 टक्क्यांपर्यंत असू शकतं. त्यामुळे हा द्रवपदार्थ ज्वालाग्रही असतो. तो पटकन पेट घेतो. स्वयंपाकाचा गॅस, चूल किंवा कुठल्याही आगीजवळ हँड सॅनिटायझरचा वापर करू नये, असं दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर महेश मंगल यांनी सांगितलं. आवश्यक तेवढाच - साधारण 2 - 3 मिली सॅनिटायझर हातावर घ्यावा आणि हात चोळून ते पूर्ण कोरडे झाल्यावरच पुढच्या कामाला लागावं, असं त्यांनी सांगितलं आहे.

अतिवापराने त्वचेला हानीकारक

सातत्याने हँड सॅनिटायझर वापरून तुम्ही कोरोनाव्हायरसपासून तर स्वत:चा बचाव करत आहात, मात्र अप्रत्यक्षरित्या इतर आजारांना तर निमंत्रण देत नाहीत ना? याचं भान राखणं आवश्यक आहे, असंही तज्ज्ञ सांगतात. हँड सॅनिटायझर म्हणजे त्यात केमिकल आलंच, त्यामुळे त्याचा अति वापर केल्यानं त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

'भारताला 21 नाही तर 49 दिवसांचा लॉकडाऊन वाचवू शकतो', तज्ज्ञांचा इशारा

बॉम्बे हॉस्पिटलमधील कन्सलटंट फिजिशिअन डॉ. गौतम भन्साळी यांनी ‘न्यूज 18 लोकमत’शी बोलताना सांगितलं की, "प्रत्येक वेळी हँड सॅनिटायझर वापरायला हवं असं नाही. हँड सॅनिटायझरचा अति वापर केल्यानं स्किन इन्फेक्शन, स्किन अलर्जी होते. त्यामुळे काही कारण नसताना, गरज नसताना हँड सॅनिटायझर वापरू नका."

अन्य बातम्या

कोरोनाविरोधात लढा! सुपर हिरोंनी स्वत:सह कुटुंबाला व्हायरसपासून कसं वाचवावं?

कोरोनाग्रस्त आईने Breasfeeding केल्याने बाळाला व्हायरसचा धोका असतो का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2020 06:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading