जयपूर, 22 जून : Coronavirus किती वेगाने आणि भीतीदायक रीतीने पसरतो याचं एक उदाहरण सापडलं. एका आमदाराच्या घरात Corona घुसला आणि एका पाठोपाठ एक 18 जणांना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. COVID-19 च्या हाहाकारापासून थोड्या दूर असलेल्या राजस्थानातच ही घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
राजस्थानच्या या काँग्रेस आमदाराचं जवळपास सगळं कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आढळलं. धौलपूरच्या बारी मतदारसंघाचे आमदार गिरिराज मलिंगा यांचं घरच कोरोनाचा हॉटस्पॉट झालं आहे. कारण जिल्ह्यात सोमवारी 77 नवे कोरोनारुग्ण सापडले त्यातले 18 गिरिराज मलिंगा यांच्या एकाच घरातले आहेत. आता या जिल्ह्यात 440 कोरोनारुग्ण झाले आहेत.
गिरिराजसिंह मलिंगा, त्यांची पत्नी आणि इतर 16 जण कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. ते सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि उपचार सुरू आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.
धक्कादायक! तब्बल 7 तास कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृतदेह होता घरात
मार्कशीट घोटाळ्यामुळे मलिंगा यांचं नाव गेल्या वर्षी चर्चेत होतं. नववीची खोटी मार्कशिट दाखवून दहावीची परीक्षा दिली असा आरोप केला गेला होता.
मलिंगा काँग्रेसचे आमदार असून राजस्थानच्या विधानसभेत तीनदा निवडून आलेले आहेत.
राजस्थानात आतापर्यतं 14,930 कोरोनारुग्ण आढळले असून 349 जणांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या काही दिवसात या राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे.
संकलन - अरुंधती
अन्य बातम्या
कोरोनाचा स्फोट! मुंबईत या कारणामुळे झपाट्यानं वाढतोय व्हायरसचा प्रादुर्भाव!
अखेर चीननेही केलं मान्य; भारतीय लष्कराच्या कारवाईत चिनी कमांडिंग ऑफिसर ठार
आजही राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 3721 जणांची विक्रमी वाढ, धोका वाढला