• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Coronavirus Live Updates : यवतमाळमध्ये आणखी एका रुग्णाला कोरोनाची लागण

Coronavirus Live Updates : यवतमाळमध्ये आणखी एका रुग्णाला कोरोनाची लागण

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार पसरला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 105हून अधिक आहे. वाढत्या संसर्गामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर आरोग्य विभागाकडून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, काळजी घेण्याचं आवाहन वारंवार करण्यात आलं आहे. जगभरात हजारो लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 100हून अधिक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर देशासह जगभरातील कोरोनाचे सर्व लाईव्ह अपडेट्स.

 • News18 Lokmat
 • | March 16, 2020, 13:11 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  13:4 (IST)

  यवतमाळमध्ये आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.

  13:3 (IST)

  मुंबईत आणखी चार कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

  11:9 (IST)

  मुंबई- कोरोना वायरसच्या वाढत्या प्रभावामुळे पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय. ज्या देशात कोरोना व्हायरसचा प्रभाव आहे त्या देशातून आलेल्या आणि परदेशी नागरीकांना ट्रेन बुकींग आधी तपासणी करावी लागणार. ट्रेनमध्ये होणा-या गर्दीमुळे पश्चिम रेव्लेचा निर्णय.

  11:8 (IST)

  इटलीमध्ये रविवारी एक दिवसात कोरोना विषाणूमुळे 368 लोकांचा मृत्यू. इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे 15 मार्चपर्यंत म्हणजे आतापर्यंत 1802 मृत्यूची संख्या. इटलीमध्ये आतापर्यंत कोरोनाव्हायरसच्या एकूण 24747 प्रकरणे

  11:7 (IST)

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आजपासून दोन आठवड्यांसाठी गुजरात सर्व शैक्षणिक संस्था, मल्टिप्लेक्स आणि जलतरण तलाव बंद करण्यात आले आहेत.

  11:6 (IST)

  महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातला सगळ्यात मोठा असलेला पेठ वडगावचा जनावरांचा बाजार बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं घेतला निर्णय. विक्रेते आणि ग्राहकांना  बाजारात न येण्याचं आवाहन. 31 मार्चपर्यंत बंद राहणार बाजार.

  10:48 (IST)

  परदेशातून आलेल्या नागरिकांची बुकिंग करण्याआधी तपासणी होणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय
   

  10:38 (IST)

  कोरोनामुळे फ्रान्समध्ये 29 रुग्णांचा मृत्यू
   

  10:4 (IST)

  कोरोनामुळे MPSCची परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली आहे. 30 मार्चनंतर परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

  10:3 (IST)

  मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची प्राध्यापकांची मागणी, कोरोनामुळे परीक्षा पुढे घेण्यात याव्यात यासंदर्भात दिला प्रस्ताव.
  -
   

  मुंबई, 16 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार पसरला आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 105हून अधिक आहे. वाढत्या संसर्गामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर आरोग्य विभागाकडून गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, काळजी घेण्याचं आवाहन वारंवार करण्यात आलं आहे. जगभरात हजारो लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 100हून अधिक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर देशासह जगभरातील कोरोनाचे सर्व लाईव्ह अपडेट्स.