मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाचे थैमान! इटलीत 368 तर इरानमध्ये 24 तासांत 113 लोकांचा मृत्यू

कोरोनाचे थैमान! इटलीत 368 तर इरानमध्ये 24 तासांत 113 लोकांचा मृत्यू

चीननंतर कोरोना विषाणूमुळे इटली, इराण आणि स्पेनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चीननंतर कोरोना विषाणूमुळे इटली, इराण आणि स्पेनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चीननंतर कोरोना विषाणूमुळे इटली, इराण आणि स्पेनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
दुबई, 16 मार्च : चीननंतर कोरोना विषाणूमुळे इटली, इराण आणि स्पेनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इटलीमध्ये दिवसभरात 368 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे इटलीमध्ये मृतांची संख्या आता 1,809वर पोहचली आहे. तर, इराणमध्ये गेल्या 24 तासांत 113 जणांचा मृत्यू झाला असून एक हजाराहून अधिक संसर्ग झाल्याची नोंद आहे. भीतीदायक परिस्थिती वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार सध्या इटली, इराण आणि स्पेनमधील परिस्थिती चिंताजनक आहे. इराणमधील मृतांची संख्या वाढून 724 झाली आहे. तर दुसरीकडे स्पेनमध्ये एका दिवसात 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्पेनमध्ये दोन आठवड्यांची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. मृतांचा आकडा 14 झाला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात सहा हजारहून अधिका लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 1 लाख 59 हजार 844 संसर्गित असल्याचे आढळले आहे. वाचा-युरोपियन देशात स्पेन कोरोनाचा नवा केंद्रबिंदू, 24 तासांत शेकडो रुग्णांचा मृत्यू भारतात 110 लोकांना कोरोनाची लागण भारतात विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या 110 झाली आहे, तर उत्तराखंडमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. तर, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात रुग्णांची संख्या वाढती आहे. भारतात अद्याप कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. भारतात महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आहेत. यातील पुण्यात 16 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. वाचा-क्या बात है! तब्बल 76 हजार लोकांनी कोरोनाला हरवलं, निरोगी होऊन परतले घरी पाक सीमाही सील केली जाईल दरम्यान, परदेशातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने पाच शेजारील देशांच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, भारत-नेपाळ (India - Nepal), भारत-बांगलादेश (India - Bangladesh), भारत-भूतान (India - Bhutan), भारत-म्यानमार (India - Myanmar) सीमारेषा सील करण्यात आल्या आहेत. 14 मार्च रोजी 12 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. 15 मार्चच्या रात्री 12 वाजल्यापासून पाकिस्तानच्या सीमाही सील करण्यात येणार आहे. आता या हद्दीतून प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी आहे. वाचा-कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी एमर्जन्सी फंड, भारताकडून तब्बल 7 कोटी रुपयांचं योगदान 76 हजार रुग्ण झाले बरे कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असला तरी त्याचा मृत्यू दर कमी आहे. कोरोनाविषयी माहिती देणारी वेबसाइट वर्ल्डोमीटर डॉट कॉमने आतापर्यंत 1 लाख 60 हजार 564 लोकांना याची लागण झाली आहे. तर यातील 5 हजार 962 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूपेक्षा या आजारातून निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. जगातील 75 हजार 959 लोकं या आजाराला मात देऊन बरे झाले आहेत. तर अजूनही 78 हजार 643 लोकांवर उपचार सुरू आहेत. जर सकारात्मक दृष्टीने पाहिले तर सुमारे 72 हजार 989 लोकांना म्हणजेच जवळपास 93 टक्के लोकांना किरकोळ समस्या आहेत. तर, केवळ 5 हजार 654 लोकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे कोरोनाला हरवणे लवकरच शक्य होऊ शकते.
First published:

Tags: Corona, Corona virus in india

पुढील बातम्या