मराठी बातम्या /बातम्या /देश /

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लॉकडाऊन वाढला; मंत्रालयाने केली मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी लॉकडाऊन वाढला; मंत्रालयाने केली मोठी घोषणा

विमानातून पहिल्यांदा प्रवास करताना अनेकजण चिंताग्रस्त असतात. विमानात जाताना नक्की काय घेऊन जायचं आणि त्यासाठीची तयारी कशी करायची याबद्दल काही कल्पना नसते. तसेच प्रवासा दरम्यान कोणत्या अडचणीचा सामना करावा लागला तर काय करावं असाही प्रश्न त्यांच्या मनात असतो.

विमानातून पहिल्यांदा प्रवास करताना अनेकजण चिंताग्रस्त असतात. विमानात जाताना नक्की काय घेऊन जायचं आणि त्यासाठीची तयारी कशी करायची याबद्दल काही कल्पना नसते. तसेच प्रवासा दरम्यान कोणत्या अडचणीचा सामना करावा लागला तर काय करावं असाही प्रश्न त्यांच्या मनात असतो.

Unlock ची प्रक्रिया सुरू झालेली असली, तरी अद्याप आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी मिळालेली नाही.

दिल्ली, 26 जून : देशात Coronavirus चा संसर्ग आटोक्यात येण्याची चिन्हं दिसत नाहीत, उलट दररोज रुग्णसंख्येचा नवा विक्रमी आकडा समोर येतो आहे. त्यामुळे Unlock ची प्रक्रिया सुरू झालेली असली, तरी अद्याप आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी मिळालेली नाही. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (Civil Aviation Ministry)  गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलैपर्यंत आंतररराष्ट्रीय उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात COVID-19 च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू झाला. 25 मेला काही अटी आणि शर्थींसह देशांतर्गत विमान वाहतूक सुरू झाली. ठराविक मार्गांवरच ही वाहतूक सुरू आहे. आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही सुरू होण्याची अपेक्षा होती. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने 15 जुलैपर्यंत विमान वाहतूक सुरळीत होणार नाही.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ठराविक रूटवरची काही मोजक्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली जाईल. त्या त्या वेळच्या गरजेनुसार हा निर्णय घेतला जाईल, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

देशांतर्गत प्रवासासाठी सर्वात सोयीचा आणि स्वस्त पर्याय असलेल्या रेल्वेनेही लॉकडाऊन वाढवला असून 12 ऑगस्टपर्यंत रेल्वेप्रवास करता येणार नाही. रेल्वेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांसाठी रेल्वेप्रवास दूरच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पॅसेंजर, मेल एक्स्प्रेस, उपनगरीय रेल्वे गाड्या 12 ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्या साहाय्याने प्रवासाची स्वप्न बघणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

वस्तू आयात करणे चुकीचे नाही, पण चीनमधून गणेशमूर्ती का आयात करायच्या?

कोव्हिड-19 मुळे जवळपास 3 महिन्यांपासून रेल्वेची सामान्य सेवा बंद आहे. त्यातच रेल्वेने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने 14 एप्रिल रोजी आणि त्याआधी करण्यात आलेल्या सर्व रेग्यूलर वेळापत्रकानुसार धावण्यात येणाऱ्या गाड्यांचे बुकिंग रद्द केले आहे. या बुकिंगचा पूर्ण रिफंड प्रवाशांना देण्यात येणार आहे. रेल्वेचे याबाबत मत स्पष्ट आहे की, सामान्य प्रवासी रेल्वे सुरु होण्यासाठी अजून बराच कालावधी जाईल.

संकलन - अरुंधती

First published:

Tags: Coronavirus