Home /News /national /

कुख्यात डॉन छोटा शकीलच्या लाडक्या बहिणीचं मुंबईत मृत्यू, कोरोनाचा रिपोर्ट आज येणार

कुख्यात डॉन छोटा शकीलच्या लाडक्या बहिणीचं मुंबईत मृत्यू, कोरोनाचा रिपोर्ट आज येणार

पोस्टमॉर्टम दरम्यान फहमीदा यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. या चाचणीचा अहवाल आज येणार आहे

    प्रतिनिधी, विवेक गुप्ता मुंबई, 21 मे : कुख्यात गुंड छोटा शकीलवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याची लहान बहीण फहमीदा यांचा मृत्यू झाला. छोटा शकीलच्या म्हणण्यानुसार फहमीदा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. छोटा शकील आणि अंडरवर्ल्ड सूत्रांनी सांगितले की, फहमीदा आरिफ शेख उर्फ ​​आपचा मृत्यू बुधवारी दुपारी 3 वाजता झाला. वयाच्या 50 व्या वर्षी फहमीदा यांनी मुंबईतील तुंगा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहात होत्या. फहमीदा यांचे पती आरिफ शेख प्रॉपर्टीची संदर्भातील कामं करतात. छोटा शकीलच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय अहवालानंतरच बहिणीच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल. त्याचं बहिणीच्या कुटुंबीयांशी यासंदर्भात बोलणं झाल्याचं सांगितलं आहे. फहमिदा आधी दुबईमध्ये राहात होत्या 2006 मध्ये त्या मुंबईमध्ये स्थायिक झाल्या. अंडरवर्ल्डमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फहमीदा ह्या छोटा शकीलच्या सर्वात प्रिय बहिणींपैकी एक होत्या. चार भावंडांपैकी त्या सर्वात लहान होत्या. 2011 मध्ये शकीलचे वडील बाबुमिया शेख यांचे जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. हे कुटुंब दक्षिण मुंबईतील टँकर मोहल्ला भागातील इस्माईल बिल्डिंगमध्ये राहत होते. प्रोटोकॉलनुसार पोस्टमॉर्टम दरम्यान फहमीदा यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. या चाचणीचा अहवाल आज आल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकले.  छोटा शकील हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा टॉप गुंड म्हणून ओळखला जातो. सध्या तो पाकिस्तानमध्ये लपून बसल्याचं सांगितलं जात आहे. संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या