धक्कादायक! उपचारासाठी दारोदार भटकत राहिली गर्भवती, जुळ्याचा पोटातच मृत्यू

धक्कादायक! उपचारासाठी दारोदार भटकत राहिली गर्भवती, जुळ्याचा पोटातच मृत्यू

रुग्णालयाकडून दुर्लक्ष आणि वेळेत वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या पतीनं केला आहे.

  • Share this:

मल्लपुरम, 28 सप्टेंबर : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात जुळ्या मुलांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आलं आहे. या महिलेला तिन्ही रुग्णालयांमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या भीतीमुळे दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला होता.

गर्भवती महिला तीन रुग्णालयांमध्ये उपचारासाठी खेटे घातल होती. या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय तिथल्या एका रुग्णालयाला आला आणि त्यांनी उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. वेळेवर वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे या महिलेच्या पोटात जुळ्या मुलांचा मृत्यू झाला. ही घटना केरळच्या मल्लापुरमची असल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा-गळ्यात पाटीनं घालून पोलीस स्टेशनमध्ये पोहचला कुख्यात गुंड आणि...

या महिलेचे पती एनसी शेरिफ यांनी रुग्णालयाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला आहे. 20 वर्षांच्या शहालाला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर शनिवारी पहाटे त्यांनी मंजरी मेडिकल कॉलेज इथे उपचारासाठी नेले. मात्र या रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत असं कारण देऊन नाव नोंदणी करण्यासाठी नकार दिला. संध्याकाळी 6.30 वाजता मंजरी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात अनेक विनंतीनंतर बेड मिळाला आणि त्यानंतर या महिलेची प्रसूती करण्यात आली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाल्यानं या जुळ्या मुलांचा मृत्यू झाला होता.

पतीने सांगितलं की सुरुवातीला मंजरी रुग्णालयानं आम्हाला बेड नाही त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात जा असं सांगितलं. प्रसूती कळा येत असूनही रुग्णालयात दारोदार मदतीसाठी महिला आणि तिचा पती भटकत राहिले. शेरीफच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती मात्र उपचारानंतर पुन्हा चाचणी केल्यावर ही चाचणी निगेटिव्ह आली होती.

हे वाचा-ALERT! तुमच्या मोबाईलमधून SMS आणि नंबर चोरत आहेत हे 17 Apps

शनिवारी अचानक प्रसूती कळा येऊ लागल्या आणि तातडीनं रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. रुग्णालयात दाखल करताना दुसऱ्या चाचणीचा अहवाल डॉक्टरांना पटणारा नव्हता त्यामुळे उपचारासाठी दाखल करून घेण्यात दिरंगाई झाली आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे पोटातच मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. दरम्यान वेळेवर उपचार न दिल्याचा आरोप शेरीफ यांनी मंजरी रुग्णालयावर केला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 28, 2020, 1:44 PM IST

ताज्या बातम्या