Home /News /national /

Coronavirus : भारत सरकार करणार 3 हजार कैद्यांची सुटका?

Coronavirus : भारत सरकार करणार 3 हजार कैद्यांची सुटका?

जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असून भारतातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.

    नवी दिल्ली, 23 मार्च : सध्या कोरोनामुळे जगभर हाहाकार उडाला आहे. अनेक देशांमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. चीननंतर इराण आणि इटलीत मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतातही कोरोना वेगानं पसरत चालला आहे. देशातील अनेक राज्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, तिहार तुरुंगातून 3 हजार कैद्यांची सुटका केली जाण्याची शक्यता आहे. यामधील 1500 जणांची सुटका पॅरेलवर आणि अंतरीम जामीनावर करण्यात येईल अशी माहिती समजते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कैद्यांच्या सुटकेचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याआधी इराणमध्येही जवळपास 10 हजार कैद्यांची सुटका कऱण्याचा निर्णय तिथल्या सरकारनं घेतला आङे. चीन आणि इटलीनंतर इराणमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून इराण सरकारनं हे पाऊल उचलण्याचा निर्णय़ घेतल्याचं वृत्त तिथल्या माध्यमांनी दिलं होतं. देशात कोरोना पसरत असल्यानं त्याला रोखण्यासाठी मोदी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी त्यांचं कर्तव्य कोणतीही भीती न बाळगता पार पाडत आहे. रविवारी पाळण्यात आलेल्या जनता कर्फ्यूनंतर सायंकाळी 5 वाजता त्या सर्वांचे आभार टाळ्या आणि थाळी वाजवून देशवासियांनी केलं. हे वाचा : Coronavirus हवेतून पसरू शकतो? WHO ने केलं सावध, काय सांगतं संशोधन? भारतात आतापर्यंत 433 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर देशात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील 22 राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असून या राज्यांमध्ये लॉकडाउनची स्थिती निर्माण झाली आहे. हे वाचा : देशात Covid-19 च्या रुग्णांसाठी पहिलं स्वतंत्र हॉस्पिटल सज्ज; रिसायन्स इंडस्ट्री
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या