Home /News /national /

'या' टेस्टमुळे समजणार भारतातील Coronavirus रुग्णांचा खरा आकडा

'या' टेस्टमुळे समजणार भारतातील Coronavirus रुग्णांचा खरा आकडा

कोरोनाव्हायरसचं (Coronavirus) निदान करण्यासाठी सिरोलॉजिकल टेस्ट (serological test) म्हणजे रक्तचाचणी (blood test) केली जाण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 28 मार्च : जगभरातील कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली आहे. तर भारतात (India) 800 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. मात्र चीनमध्ये ठिक झालेल्या रुग्णांना या व्हायरसची पुन्हा लागण झाल्याचं समोर आलं आहे, शिवाय काही कोरोनाग्रस्तांमध्ये याची लक्षणंही दिसत नाहीत. त्यामुळे कदाचित भारतातील हा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. यासाठी आता कदाचित कोरोनाव्हायरसचं निदान करण्यासाठी सिरोलॉजिकल टेस्ट (serological test) म्हणजे रक्तचाचणी केली जाऊ शकते. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) सिरोलॉजिकल टेस्टसाठी 15 लाख अँटिबॉडी किट्ससाठी कोटेशन मागवलं आहे. या किट्सचा उपयोग रिसर्च, मॉनिटरींग आणि तपासणीसाठी होऊ शकतो. रक्तातील अँटिबॉडीजमुळे किती लोकं व्हायरसच्या संपर्कात आलेत ते समजू शकेल. काय आहे सिरोलॉजिकल टेस्ट? शरीरात एखाद्या व्हायरसने किंवा पॅथोजनने हल्ला केल्यानंतर शरीर त्याच्याशी लढतं. पॅथोजनला अँटिजनही म्हणतात.  हे फॉरेन पार्टिकल म्हणजे शरीराच्या बाहेरील घटक असतात, ज्यांनी शरीरात प्रवेश केल्यानंतर शरीरात अँटिबॉडीज तयार होतात आणि या अँटिबॉडीज पॅथोजनवर हल्ला करतात. आणि त्यांना कमजोर बनवतात त्यामुळे आपण निरोगी राहतो आणि म्हणूनच एकदा झालेला आजार पुन्हा झाल्यास आपल्यावर त्याचा परिणाम कमी होतो. हे वाचा - Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 834 वर, आतापर्यंत 19 जणांनी गमावले प्राण सिरोलॉजिकल टेस्टमधून याच अँटिबॉडीजबाबत माहिती मिळते.  ही रक्तचाचणी आहे. जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या (John Hopkins Bloomberg School of Public Health) मते, एखादी व्यक्ती व्हायरसच्या संपर्कात आली की नाही हे तपासण्यासाठी ही टेस्ट असते. यामध्ये रक्तातील सिरम घेतलं जातं, ज्यामध्ये लाल आणि पांढऱ्या रक्तपेशी नसतात. रक्तातील सिरमची चाचणी केली जाते आणि त्यामध्ये काही अँटिबॉडीज आहेत का हे पाहिलं जातं. या अँटिबॉडीज एखादा पॅथोजन असल्यावर तयार होतात.  व्हायरसचा संसर्ग झाल्यास सिरोलॉजिकल टेस्टमार्फत रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती एखाद्या विशेष पॅथोजनवर प्रतिक्रिया देते आहे की नाही हे तपासलं जातं. हे वाचा - Coronavirus : भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 834 वर, आतापर्यंत 19 जणांनी गमावले प्राण सध्या जगभरात रिअल टाइम polymerase chain reaction (PCR) आधारित तपासणी कोरोना पॉझिटिव्हची पुष्टी देण्याचा पहिला मार्ग आहे. याला Real-time polymerase chain reaction किंवा क्वांटिटेटिव चेन रिअॅक्शनही म्हटलं जातं. यात रियल टाइममध्ये डीएनएची (DNA) तपासणी केली जाते.  यामध्ये संशयित रुग्णाच्या नाक आणि घशातील नमुने घेतले जातात आणि त्यांची जेनेटिक तपासणी केली जाते. रिअल टाइम PCR मध्ये रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्यामध्ये व्हायरस असतील की नाही, शिवाय एखाद्याच्या शरीरात व्हायरस असल्यानंतरही त्याच्यात लक्षण दिसत नसतील तर व्हायरसचं निदान होत नाही. मात्र सिरोलॉजिकल टेस्टच्या मदतीने हे समजू शकतं. शरीरातील अँटिबॉडीज हे सांगण्यासाठी मदत करतात. हे वाचा - 'कोरोनाची चाचणी करून घे', संतापलेल्या पत्नीने नवरा आणि सासूला विळ्याने केली मारहाण
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या