कोरोनाची भीती घालवण्यासाठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांना अशी दाखवली जादू, नक्की पाहा हा VIRAL VIDEO

कोरोनाची भीती घालवण्यासाठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांना अशी दाखवली जादू, नक्की पाहा हा VIRAL VIDEO

कोरोनाव्हायरसपासून वाचण्यासाठी नियमितपणे हात धुण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मार्च : कोरोनाव्हायरसची (coronavirus) दहशत सध्या साऱ्या जगात आहे. भारतातही हा विषाणू वेगाने पसरत आहे. त्यामुळे नियमितपणे हात धुण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. बऱ्याच देशांमध्ये हात कसे धुवायचे याबद्दल काही व्हिडिओ तयार केले गेले आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक शिक्षिकेने मुलांमधील भिती घालवण्यासाठी एका व्हिडीओ तयार केला. यात मुलांना हात धुण्याचे महत्त्व शिक्षकाने अगदी सोप्या पद्धतीने सांगितले. यासाठी शिक्षकांनी मिरपूड आणि साबणाचा वापर केला.

वाचा-पुणेकरांना घाबरून जाऊ नका...फक्त या 21 गोष्टी नीट लक्षात ठेवा!

एका ट्विटर युझरने हा व्हिडीओ अपलोड करताना, “साबणाने हात धुण्याचे महत्त्व मुलांना दाखवण्यासाठी ही अचूक पद्धत आहे. यामध्ये साबणाचे महत्त्व स्पष्ट होत आहे”, असे कॅप्शन दिले आहे. यासाठी शिक्षिकेने टेबलावर दोन प्लेट्स ठेवल्या. यातील एकात पाणी आणि मिरपूडीचे मिश्रण व्हायरस म्हणून वापरण्यात आले आहे. तर, दुसरीकडे साबण ठेवण्यात आला आहे. शिक्षिकेने या दोघांना एकत्र करून साबणाने विषाणूपासून दूर कसे राहता येते हे मुलांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितले.

वाचा-मुंबईकरांनो काळजी घ्या, शहरात कोरोनाव्हायरसचे 80 संशयित रुग्ण

वाचा-कोरोना रुग्ण समजून बायकोला दिला त्रास, पोलिसांनी तुरूंगात केला नवऱ्याचा 'उपचार'

हा व्हिडीओ 13 मार्च रोजी ट्विटरवर शेअर करण्यात आला होता आणि आता तो खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत 40 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सोशल मीडियावर, लोक शिक्षिकेच्या या कल्पनेचे कौतुक करत आहेत.

वाचा-Coronavirus दरम्यान व्हायरल होतेय ही शॉर्टफिल्म, पाहिल्यावर भीतीनं उडेल थरकाप

मुंबई-पुण्यात कोरोनाचा धोका वाढला

राज्यात कोरोनाव्हायरसचे (Coronavirus) सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत, तर मुंबईत कोरोनाव्हायरसचे तब्बल 80 संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या 32 वर पोहोचली आहे. पुण्यात 10, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईत प्रत्येकी 5, नागपुरात 4, यवतमाळमध्ये 2 तर ठाणे, अहमदनगर, कल्याण, पनवेल, नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. रुग्णांची संख्या वाढली असली, तर रोगप्रतिकारक शक्तीने या व्हायरसवर मात करणं शक्य आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सरकार आणि डॉक्टरांच्या सूचना पाळाव्यात, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेशष टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.

First published: March 15, 2020, 6:18 PM IST

ताज्या बातम्या