मराठी बातम्या /बातम्या /देश /

'किमान 15 मिनिटं उन्हात राहा व्हायरसचा नाश होईल', कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा अजब सल्ला

'किमान 15 मिनिटं उन्हात राहा व्हायरसचा नाश होईल', कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचा अजब सल्ला

कोरोनाव्हायरस (Coronavirus) जास्त पसरू नये, यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे (Ashwini Kumar Choubey) यांनी कोरोनावर अजब उपचार सांगितला आहे.

  नवी दिल्ली, 19 मार्च :  भारतात (India) कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढते आहे. विषाणू जास्त पसरू नये, यासाठी नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला जातो आहे. अशामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी कोरोनावर अजब उपचार सांगितला आहे. 'दुपारी 10 ते 15 मिनिटं कडक ऊन घ्या, त्यामुळे कोरोनासारख्या व्हायरसचा नाश होईल', असा सल्ला केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे (Ashwini Kumar Choubey) यांनी दिला आहे. एएनआयने याबाबत ट्विट केलं आहे. संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अश्विनीकुमार चौब म्हणाले, "सकाळी 11 ते दुपारी 2 यादरम्यान ऊन खूप असतं, सूर्याची किरणं चांगली असतात. अशा उन्हात कमीत कमी 10 ते 15  मिनिटं राहून सूर्यकिरणं शरीरावर घ्यायला हवीत. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळतं आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. शिवाय कोणत्याही व्हायरसचा नाश होतो." हे वाचा - इतर देशांच्या तुलनेत भारतात 'कोरोना'चा कमी प्रसार; घाबरू नका, मात्र काळजी घ्या दरम्यान वाढत्या तापमानात कोरोनाव्हायरसचा नाश होईल यावर अद्यापही प्रश्नचिन्हच आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनीही सांगितलं की, गरमीत कोरोनाव्हायरसचा नाश होईल, असे काही पुरावे मिळालेले नाहीत. WHO शी संबंधित Global Outbreak Alert चे चेअरपर्सन डेल फिशर यांच्या मते, 'तापमान वाढल्याने व्हायरस कमी होईल मात्र त्याचा पूर्णपणे नाश होईल, असं वाटत नाही. त्यामुळे वातावरणापेक्षा आयसोलेटवरच जास्त भर द्यावा' हे वाचा - FACT CHECK - उकाडा वाढल्यानंतर महाभयंकर कोरोनाव्हायरसचा नाश होणार? काय सांगतात तज्ज्ञ जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात या व्हायरसने 8,000 पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे, तर 2 लाखांपेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. भारतात 168 रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
  !function(e,i,n,s){var t="InfogramEmbeds",d=e.getElementsByTagName("script")[0];if(window[t]&&window[t].initialized)window[t].process&&window[t].process();else if(!e.getElementById(n)){var o=e.createElement("script");o.async=1,o.id=n,o.src="https://e.infogram.com/js/dist/embed-loader-min.js",d.parentNode.insertBefore(o,d)}}(document,0,"infogram-async");
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या