दूध पिशवी, डोअर बेल आणि पेपरमधून कोरोना पसरू शकतो? काय म्हणतात डॉक्टर...

दूध पिशवी, डोअर बेल आणि पेपरमधून कोरोना पसरू शकतो? काय म्हणतात डॉक्टर...

कोरोना व्हायरसचा विषाणू किती वेळ जिवंत राहातो?

  • Share this:

मुंबई, 19 मार्च : देशात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. देशात 170हून अधिक तर महाराष्ट्रात जवळपास 49 कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी विविध मार्गानं सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. अशात सुरक्षा म्हणून राज्यात सगळ्यात महत्त्वाच्या शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याच दरम्यान कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यानं तो जसा हात आणि श्वसनातून पसरतो तसाच एखाद्या वस्तूला हात लावल्यानंतरही त्याचे किटाणू आपल्या शरीरात जाऊ शकतात का? या बाबत अनेकांना संभ्रम आहे. अशा काही गोष्टी ज्यांना आपण रोज हात लावतो त्यापासून आपल्याकडे कोरोनाचे विषाणू येऊ शकतात का? एम्स रुग्णालयातील डॉक्टर विजय कुमार यांनी लोकांच्या मनातील हा संभ्रम दूर करण्यासाठी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दुधाचं पाकीट आणि डोअर बेल आणि न्यूज पेपरमधून कोरोना व्हायरस पसरत नाही. मात्र त्यावर काही तास या व्हायरसचे विषाणू जिवंत राहू शकतात. त्यामुळे या वस्तुंना हात लावल्यानंतर लगेच साबणानं स्वच्छ हात धुवायला हवेत. डॉक्टर विजय कुमार यांच्या म्हणण्यानुसार देशात सध्याची स्थिती इतर देशांच्या तुलनतेत वाईट नाही. की प्रत्येक गोष्टीवर कोरोनाचे विषाणू असतील. तुम्हाला जर सर्दी, खोकला किंवा अस्वस्थ वाटत असेल तर कोणतंही औषध स्वत: न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्या. त्याच सोबत लोकांसोबत संपर्क टाळा त्यामुळे इतरांना इन्फेक्शन होणार नाही.

!function(e,i,n,s){var t="InfogramEmbeds",d=e.getElementsByTagName("script")[0];if(window[t]&&window[t].initialized)window[t].process&&window[t].process();else if(!e.getElementById(n)){var o=e.createElement("script");o.async=1,o.id=n,o.src="https://e.infogram.com/js/dist/embed-loader-min.js",d.parentNode.insertBefore(o,d)}}(document,0,"infogram-async");

ह्या व्हायरसचे विषाणू शिकल्यानंतर किंवा खोकल्यावर जे थुंकीचे तुषार उडतात किंवा थुंकी उडते त्यातून वेगानॆ पसरतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टी करताना रुमाल किंवा कॉटनचा कपडा अवश्य जवळ ठेवा. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हात न धुता नाक, चेहरा, डोळ्यांना लावू नका, ही इंद्रीय सेन्सेटीव्ह असतात. त्यातून विषाणू आपल्या शरीरात घुसखोरी करू शकतात. त्यामुळे हात स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा.

कोरोना व्हायरसचा विषाणू किती वेळ जिवंत राहातो?

एका रिसर्चनुसार कोरोनाचे विषाणू प्लास्टिक, हवा आणि स्टीलच्या वस्तुंवर 3 दिवसांपर्यंत जिवंत राहातो. कार्डबोर्ड आणि पिशवीवर सगळ्यात जास्त काळापर्यंत जिवंत राहण्याची क्षमता असते.

First published: March 20, 2020, 6:28 AM IST

ताज्या बातम्या