मराठी बातम्या /बातम्या /देश /

'कोरोना'वर टेक्निकल सोल्युशन द्या आणि 1 लाख रुपये मिळवा, मोदी सरकारची ऑफर

'कोरोना'वर टेक्निकल सोल्युशन द्या आणि 1 लाख रुपये मिळवा, मोदी सरकारची ऑफर

केंद्र सरकारने कोविड 19 सोल्युश चॅलेंज (COVID-19 solution challenge) दिलं आहे.

केंद्र सरकारने कोविड 19 सोल्युश चॅलेंज (COVID-19 solution challenge) दिलं आहे.

केंद्र सरकारने कोविड 19 सोल्युश चॅलेंज (COVID-19 solution challenge) दिलं आहे.

    नवी दिल्ली, 16 मार्च : महाभयंकर अशा कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) नाश कसा करता येईल, यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांचं संशोधन सुरू आहे. आहेत. व्हायरसचा जास्त प्रसार होऊ नये, त्याला आळा बसावा यासाठी सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र तुमच्याकडेही कोरोनाव्हायरसवर काही टेक्निकल सोल्युशन असेल तर तुम्ही तर सरकारपर्यंत पोहोचवा आणि एक लाख रुपये मिळवा, अशी ऑफर आता मोदी सरकारने (Modi government) दिली आहे. केंद्र सरकारने कोविड 19 सोल्युश चॅलेंज (COVID-19 solution challenge) दिलं आहे. या चॅलेंजच्या माध्यमातून कोरोनाव्हायरसच्या लढ्यात सरकारने आता नागरिकांनाही प्रत्यक्षरित्या सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट केलं आहे. कोरोनाव्हायरसशी संबंधित एखादं तांत्रिक आणि इनोव्हेटिव्ह सोल्युशन असेल, तर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारा आणि Mission against Coronavirus चा भाग व्हा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. हे वाचा - आता 'कोरोना'च माणसांना घाबरणार; हे कवच घातल्यावर व्हायरस जवळही येणार नाही 16 मार्च ते 21 मार्चपर्यंत कोविड 19 सोल्युशन चॅलेंजमध्ये तुम्हाला सहभागी होता येईल. बेस्ट सोल्युशनची सरकारकडून निवड केली जाईल आणि तीन बक्षीसं दिली जातील. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला अनुक्रमे एक लाख, 50 हजार आणि 25 हजार रुपये दिले जातील. हे वाचा - हे फक्त आपल्याच देशात होऊ शकतं! 'कोरोना'शी दोन हात करणाऱ्या मोदी सरकारला सॅल्युट
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या