रोम, 21 मे : कोरोना व्हायरस जगभरात थैमान सुरू आहे. कोरोना व्हायरसचे विषाणू शरीरात आहेत की नाही हे आता तत्काळ समजणार आहे. इटलीमध्ये त्यासाठी खास हेल्मेट तयार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. इटलीमध्ये स्मार्ट हेल्मेटचा वापर सुरू झाला आहे. स्मार्ट हेल्मेटमध्ये कॅमेरा आणि थर्मल स्क्रिनर बसविण्यात आली आहे. ज्याद्वारे समोरच्या व्यक्तीच्या शरीरातील तापमान किती आहे हे सहज स्कॅन करता येते.
शरीरात कोरोनाचे विषाणू आहेत हे कसं ओळखणार?
रोम विमानतळावर प्रवाशांचं स्कॅनिंग हा स्मार्ट हेलमेट करणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी खास हे हेल्मेट तयार करण्यात आलं आहे. या आधुनिक हेल्मेटद्वारे विमानतळावरील प्रवाशांचे आणि कर्मचार्यांचे तापमान तपासले जाईल. त्यातील कॅमेरा आणि थर्मल स्कॅनर शरीरातील तापमानात होणारे चढउतारांना सांगणार आहे.
हे वाचा-विनाकारण हिंडणाऱ्या मुंबईकरांवर होणार कठोर कारवाई, CISF जवान एक्शनमध्ये
सुरक्षा अधिकारी स्मार्ट हेल्मेट घालून विमानतळावर लोकांना स्कॅन करण्यासाठी उभे राहातील. हेल्मेटसमोर येऊन प्रत्येक प्रवाशानं आपला चेहरा दाखवायचा आहे. त्यानंतर हेल्मेटमधून शरीरातील तापमान स्कॅन केलं जाणार आहे. या हेल्मेटचा वापर करणारं रोम हे युरोपातील पहिलं शहर चर्चेचा विषय झालं आहे.
प्रवाशांच्या शरीराचं तापमान कोरोना विषाणूच्या नियमावलीनुसार असेल तर त्या प्रवाशाला विमानातून प्रवास करण्यास बंदी घालण्यात येणार आहे. पुढच्या महिन्यापासून रोममध्ये विमान सेवा सुरु करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारनं ही तयारी सुरू केली आहे. 7 मीटर लांबपर्यंत उभ्या असलेल्या तरुणाच्या शरीरातील तापमान स्कॅन करण्याची या हेल्मेटची क्षमता आहे. हे हेल्मेट चीन आणि इटलीतील इंजिनियर्सनी एकत्र येऊन तयार केलं. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी याचा वापर करण्यात येणार असल्यानं या हेल्मेटची सोशल मीडियावर तुफान चर्चे सुरू झाली आहे.
हे वाचा-पोलिस दलातील या बातमीनं महाराष्ट्र पुन्हा सुन्न, कोरोनामुळे हेड कान्स्टेबलचा बळी
संपादन- क्रांती कानेटकर
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.