ओळख आहे? तरच मिळेल ICU बेड; Coronavirus सर्वेक्षणातून समोर आली भीषण परिस्थिती

ओळख आहे? तरच मिळेल ICU बेड; Coronavirus सर्वेक्षणातून समोर आली भीषण परिस्थिती

देशभरात फक्त 4 टक्के Coronavirus रुग्णांना नेहमीच्या सरळ मार्गाने बेड उपलब्ध झाला आहे, असं एका सर्व्हेत दिसलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : भारतात Coronavirus चे रुग्ण प्रचंड वेगाने वाढत आहेत.  Covid-19 रुग्णसंख्येत भारत जगात आता दुसऱ्या स्थानावर आला आहे. पण मृत्यूदर कमी ही इतके दिवस दिलासादायक बाब मानली जात होती. पण कोरोनावर उपचार मिळणं आता भारतात सोपं राहिलेलं नाही. प्रत्यक्षात Corona झालेल्या रुग्णांना आणि नातेवाईकांना खरी परिस्थिती काय  याची माहिती असेल. LocalCircles या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात ओळख असेल तरच ICU बेड मिळू शकतो, अशी परिस्थिती आहे. देशभरात फक्त 4 टक्के रुग्णांना नेहमीच्या सरळ मार्गाने बेड उपलब्ध झाला आहे, असं या सर्व्हेत दिसलं आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर देखील ताण पडत आहे. भारतातील एकूण रुग्ण संख्या 55.6 लाखांच्या घरात गेली असून गेल्या दोन आठवड्यांपासून दररोज 90 लाख रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सर्वच रुग्णांना बेड उपलब्ध होऊ शकत नाहीत, हे तर उघड आहे. ICU मधील बेडचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून, ऑक्सिजन सिलिंडरचादेखील तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळत नसल्यानं हे रुग्ण नक्की काय करतात याचं सर्वेक्षण  'LocalCircles' या संस्थेने केलं.

या सर्वेक्षणातून असं दिसून आलं की, कोरोना झालेले अनेक रुग्ण आपल्या नातेवाईकांमार्फत आणि आपल्या ओळखीचा उपयोग करून सरकारी हॉस्पिटल किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवत आहेत. या रुग्णांची आकडेवारी मोठी आहे. जवळपास 78 टक्के रुग्ण आपल्या ओळखी वापरून बेड मिळवत आहेत. देशभरात किती भयंकर परीस्थिती आहे याचा अंदाज या सर्वेक्षणावरून आपल्याला येईल. अनेक रुग्णांना बेड न मिळाल्याने आपले प्राण गमवावे लागत आहेत.

या संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये देशभरातील 211 जिल्ह्यांतील 17 000 जणांनी सहभाग नोंदवून कशा प्रकारे बेड मिळाले आहेत हे सांगितलं. या 17 हजार जणांमध्ये 65  टक्के हे पुरुष होते तर 35 टक्के महिलांनी सहभाग घेतला होता. सध्या हा रिपोर्ट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि प्रत्येक राज्याच्या आरोग्य सचिवांना पाठवण्यात आला आहे.

लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार, कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी आणि शहरातल्या बड्या व्यक्तींकडून कोविड रुग्णालयांवर काही बेड राखीव ठेवण्यासाठी दबाव येत आहे. त्यामुळे खाटा रिकाम्या असूनसुद्धा प्रत्यक्षात रुग्णांवर वणवण फिरण्याची वेळ येत आहे. हीच परिस्थिती थोड्या फार फरकाने इतरत्रही दिसते. या सर्वेक्षणातून देशपातळीवर असाच प्रकार होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

दिल्ली सरकारने खासगी रुग्णालयांना आपले 80 टक्के ICU बेड हे कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात ICU च्या बेडचा तुटवडा जाणवत असून हॉस्पिटलच्या वेबसाईटवर आणि दिल्ली सरकारच्या कोरोनासंबंधी अपवर बेड रिकामा दिसतो. मात्र हॉस्पिटलमध्ये फोन केला असता ते जागा नसल्याचे सांगतात. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे.

या सर्व्हेमध्ये  LocalCircles ने लोकांना विचारलं की, तुमच्या ओळखींमध्ये कोरोना रुग्णाला बेडची गरज पडली आहे का? आणि त्यासाठी त्याने काय केलं. यावेळी 55 टक्के लोकांनी आपल्या ओळखीच्या कोणत्याही व्यक्तीला ICU  बेडची गरज पडली नसल्याचं म्हटलं. तर 40 टक्के जणांनी आपण  आपल्या ओळखीच्या लोकांच्या मदतीनं बेड मिळवल्याचं सांगितलं. त्यामुळं या सर्व्हेमधून आपण पाहू शकतो की अनेक जणांना दीर्घ कालावधीनंतर आणि खूप प्रयत्न करून देखील बेड मिळत नव्हते. तर 7 टक्के लोकांनी आपण लाच देऊन बेड मिळवल्याचं या सर्व्हेमध्ये सांगितलं आहे. त्यामुळं कोरोनाच्या या संकटात देखील भ्रष्टाचार कमी झाल्याचं दिसून येत नाही.

दरम्यान, अनेकांना लक्षणं तीव्र जाणवत असताना देखील बेड उपलब्ध होत नव्हता. त्यामुळं या सर्व्हेमध्ये अनेकांनी म्हटलं की, हॉस्पिटलच्या वेबसाईटवर बेडची उपलब्ध संख्या टाकणं बंधनकारक करावं. 92 टक्के लोकांनी याला समर्थन दर्शवलं. त्यामुळं भारतात या गंभीर संकटात देखील नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 22, 2020, 4:59 PM IST

ताज्या बातम्या