मध्यप्रदेशातही पोहोचला कोरोना, जबलपूरमध्ये 4 जण पॉझिटिव्ह

मध्यप्रदेशातही पोहोचला कोरोना, जबलपूरमध्ये 4 जण पॉझिटिव्ह

देशभरात आज तब्बल 50 नव्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यात सर्वाधिक संख्या ही केरळमधली असून त्यात 12 जणांचा समावेश आहे.

  • Share this:

जबलपूर 20 मार्च : राजकीय अस्थिरता असलेल्या मध्यप्रदेशातही आता कोरोनाने शिरकाव केलाय. जबलपूरमध्ये विदेशातून आलेल्या 4 जणांना कोरोना असल्याचं स्पष्ट झालंय. यातले 3 जण हे एकाच कुटुंबातले आहेत. सर्वांना सुभाषचंद्र बोस हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यातले तीन जण हे जर्मनी आणि एक जण हा दुबईहून आला होता. तर भोपाळमधल्या एका हॉटेलमध्ये 4 संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे. त्यांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे रिझल्ट अजुन यायचे आहेत असंही सांगण्यात आलं आहे.

देशात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. देशभरात आज तब्बल 50 नव्या रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यात सर्वाधिक संख्या ही केरळमधली असून त्यात 12 जणांचा समावेश आहे. यामध्ये 5 ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे. मुन्नारमधल्या एका रिसॉर्टमध्ये ते थांबले होते. त्यानंतर त्यांनी तिथून पळ काढला होता. कोची विमानतळावर असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. एर्नाकुलमध्ये 5, कारगौडमध्ये 6 तर पलक्कड जिल्ह्यात एकाचा समावेश आहे. गुरुवारपर्यंत देशात 173 कोरोनाबाधित होते. त्यात दिवसभरात 50 नव्या रुग्णांची भर पडली असून ती संख्या आता 223 वर गेली आहे.

बेबी डॉल, चिटियां कलाईया सारखी सुपरहिट गाणी देणारी गायिका कनिका कपूर हिची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कनिका ही काही दिवसांपूर्वीच लंडनहून परतली होती. त्यानंतर ती लखनऊमध्ये झालेल्या एका मेजवानीत उपस्थित होती. त्या मेजवानीला राजकारण आणि इतर क्षेत्रातले 300 दिग्गज उपस्थित होते असं सांगितलं जात आहे.

संसदेत पोहोचला Coronavirus? खासदारांनी सुरू केलं सेल्फ क्वारंटाइन

त्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे याही उपस्थित होत्या. कनिका ही पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाल्याने वसुंधराराजे यांनी मुलगा दुष्यंत यांच्यासह आपण क्वारंटाइन झाल्याचं जाहीर केलंय.

हे वाचा...

धक्कादायक! नराधमांच्या फाशीनंतर गूगलवर निर्भया बाबतीत शोधली जातेय 'ही' माहिती

'तो' मृत्यू Coronavirus मुळे नाही; पाचव्या बळीबद्दल सरकारने दिलं स्पष्टीकरण

 

First published: March 20, 2020, 10:29 PM IST

ताज्या बातम्या