Home /News /national /

राज्यसभा निवडणुकीला स्थगिती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा मोठा निर्णय

राज्यसभा निवडणुकीला स्थगिती, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाचा मोठा निर्णय

अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या कोरोना व्हायरसचा भारतातही प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

    नवी दिल्ली, 24 मार्च : जगभरातील अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरलेल्या कोरोना व्हायरसचा भारतातही प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर देशात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अनेक महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच आता राज्यसभा निवडणुकीला स्थगिती देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. राज्यसभेच्या 18 जागांसाठी 26 मार्चला मतदान होणार होतं. मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, मणिपुर, मेघालय, आंध्र प्रदेश आणि झारखंड या 7 राज्यांतील 18 जागांसाठी मतदान होणार होतं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजतता पुन्हा एकदा देशाला संबोधित करणार आहेत. 'कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता काही महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत देशवासीयांसोबत संवाद साधणार आहे,' असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोरोनाला फक्त भारतच हरवू शकतो', WHOने केलं कौतुक कोरोनाला हरवणं हे आपल्या हातात आहे आणि भारतच कोरोनाला हरवू शकतो असा विश्वास WHO अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी व्यक्त केला आहे. भारतात करोनाग्रस्तांची संख्या 499 वर पोहचली आहे. करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून भारतानं देशभरातल्या 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केलं आहे. भारताने कोरोनाचा फैलाव लक्षात घेता अनेक कठोर पाऊलं उचलली पण ती योग्य असल्याचं रेयान म्हणाले आहेत. कोरोनाला थांबवण्यासाठी असेच कठोर नियम लागू करा असंही WHO ने भारताला सुचवलं आहे. त्यामुळे देशात कोरोनाला थांबवण्यासाठी सरकार योग्य ती पाऊलं उचलत आहे. पण त्याला प्रत्येक नागरिकांने पाठिंबा देत नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. कोरोनावर आपणच मात करू शकतो. कोरोनाला पळून लावणं हे प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे. त्यामुळे नियम पाळा आणि घरीच सुरक्षित राहा
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Rajyasabha election

    पुढील बातम्या