कोरोनाशी 2 नर्सचा यशस्वी लढा, डिस्चार्जनंतर असा मिळाला निरोप

कोरोनाशी 2 नर्सचा यशस्वी लढा, डिस्चार्जनंतर असा मिळाला निरोप

दोन नर्सनी कोरोनाविरुद्ध यशस्वी लढा दिला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • Share this:

पंचकूला, 13 एप्रिल : भारतात कोरोना व्हायरसनं अक्षरश: थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरस झपाट्यानं पसरत चालला आहे. यातच एक दिलासा देणारी बातमी म्हणजे कोरोना व्हायरसवर मात देणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. नुकताच दोन नर्सनी कोरोनाविरुद्ध लढा दिला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नर्सना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावरील उपचार यशस्वी झाले असून त्यांना डिस्चार्ज मिळाला. कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर जेव्हा या नर्स आयसोलेशन वॉर्डमधून बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. वॉर्डमधील सर्व स्टाफने टाळ्या वाजवल्या आणि त्याच्या लढ्याचं कौतुक केलं आहे.

हरियाणा इथला पंचकूला रुग्णालयातील ही घटना आहे. 'कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि सकारात्मक वृत्ती असायला हवी. डॉक्टर आणि नर्सवर विश्वास हवा त्यांनीच आम्हाला बरं केलं आहे', असा विश्वास या नर्सने व्यक्त केला. कोरोनाविरुद्ध लढायचं असेल तर चांगला आणि पौष्टिक आहार घ्यायला हवा. दुसरं म्हणजे सावधगिरी आणि सतर्क राहायला हवं असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचा-भारतात कोरोनापासून वाचलेल्या पहिल्या व्यक्तीला कार्तिकने विचारले थेट प्रश्न

ICMR ने सांगितलं की, भारतातील 1 लाख 81 हजारहून अधिक लोकांची चाचणी केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

हे वाचा-अवघ्या 4 दिवसांत 80 जिल्ह्यांत पोहोचला कोरोना, अर्ध्या भारतात फैलाव

First published: April 13, 2020, 12:20 PM IST

ताज्या बातम्या