Home /News /national /

आणखी एक रेकॉर्ड मोडला, देशात कोरोनामुळे 24 तासांत 311 रुग्णांचा मृत्यू

आणखी एक रेकॉर्ड मोडला, देशात कोरोनामुळे 24 तासांत 311 रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोनातून बरे होण्याचं प्रमाण 50.6 टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

    मुंबई, 14 जून : देशात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 24 तासांत 311 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 11, 929 नवीन रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं कोरोनाग्रस्तांचा आकडा 3,20,922वर पोहोचला आहे. सध्या 1,49,348 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 1,62,379 रुग्णांनी कोरोनाविरुद्ध यशस्वी मात असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत असली तरी त्यातून अनेक रुग्ण बरे होत आहेत. भारतात कोरोना व्हायरसच्या साथीच्या रोगातून बरे होण्याचं प्रमाण हे आता 50.6 टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. बिहार, जम्मू-काश्मीर, झारखंड, नॅगालँड, राजस्थान, सिक्कीम, उत्तराखंडमध्ये सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आहे. तर दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडूमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. हे वाचा-येत्या 24 तासांत मुंबई-पुण्यासह अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हे वाचा- कारमध्ये असं काय सापडलं की, 'बाहुबली' फेम अभिनेत्रीला पोलिसांनी घेतलं ताब्यात संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या