Home /News /national /

कोरोनाच्या लढ्यात पंतप्रधान मोदीही झटताय अहोरात्र, पहाटे 3 पर्यंत करतात हे काम

कोरोनाच्या लढ्यात पंतप्रधान मोदीही झटताय अहोरात्र, पहाटे 3 पर्यंत करतात हे काम

देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 2500पर्यंत पोहोचला आहे.

    मुंबई, 03 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 2500पर्यंत पोहोचला आहे. तर आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनच्या सूचना दिल्या आहेत. तर अनेक राज्यांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीम जीव तोडून काम करत आहे. ही टीम प्रत्येक मिनिटांचे अपडेट्स जाणून घेत आहे. विविध उपाययोजना कशा करता येतील यावर तज्ज्ञांसोबत चर्चा सुरू आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी बऱ्याच वेळा पहाटे 03 वाजेपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्तवेळही तज्ज्ञांसोबत चर्चा करत असतात. त्यांच्याकडून सल्ले घेत असतात. रात्री उशिरापर्यंत सभांची मालिका सुरू असते. या बैठकीत पंतप्रधान मोदी महासंकटाला रोखण्यासाठी कोणती पावलं उचलता येतील यासंदर्भात चर्चा केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 11 विशेष तज्ज्ञांची एक कोअर टीम 24 तास या महासंकटाचा सामना करण्यासाठी उपयायोजना काय करता येतील यावर काम करत आहे. या 11 जणांच्या टीममध्ये डॉक्टर, वैज्ञानिक, साथरोग तज्ज्ञ याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सामावेश आहे. हे वाचा-येत्या रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटं वेळ द्या, मोदींचं देशाला आवाहन विश्वासू अधिकाऱ्यांकडून घेत आहेत प्रत्येक मिनिटांची माहिती देशभरात पर्यावरण सचिव सीके मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पथकात एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया, साथीचे रोग विशेषज्ञ डॉ. रमण यांचा समावेश आहे. पंतप्रधान मोदींनी पीएमओचे विश्‍वस्त अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी आणि मयूर माहेश्वरी यांनाही टीममध्ये सहभागी करण्यात आलं आहे. याशिवाय सचिव पी.के मिश्रा हे स्वत: सतत अनेक तज्ज्ञांच्या संपर्कात असतात त्यांच्याकडून देशभरातील प्रत्येक घडामोडीची अपडेट्स घेत असतात. मीटिंगमध्ये पंतप्रधान मोदी पाळतात सोशल डिस्टन्स मोदी जेव्हा जनतेला सोशल डिस्टन्सचं आवाहन करतात तेव्हा ते आधी स्वत:ही गोष्ट पाळतात. बैठकीला आणि महत्त्वाच्या मिटिंगमध्ये दोन खुर्चांमध्ये अंतर ठेवून बसतात. सोशल डिस्टन्सची काळजी घेतात. मागच्या शंभर वर्षात भारतावर पहिल्यांदा एवढं मोठं संकट आलं आहे. हे वाचा-कोरोनाचा धोका वाढला, देशात लॉकडाऊन असताना पंढरपूरमध्ये पार पडली बैलगाडा शर्यत
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, PM narendra modi, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या