Home /News /national /

कोरोनावर कशी मात कराल? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला 72 तासांचा फॉर्म्युला

कोरोनावर कशी मात कराल? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला 72 तासांचा फॉर्म्युला

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

    नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, प. बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. कोरोनाचा वेगानं पसरणारा संसर्ग आणि संक्रमण रोखण्यासाठी काय योजना करता येतील याबाबत चर्चा होत असल्याची माहिती मिळाली आहे. जून महिन्यापासून वेगानं वाढणारी आकडेवारी आणि रिकव्हरी रेट यासगळ्या संदर्भात 10 राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी - 80 टक्के कोरोनाचे रुग्ण या 10 राज्यांमधील आहेत - कोरोनाविरुद्धच्या लढाईत या 10 राज्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. - कोरोनाचे अॅक्टिव्ह केस 6 लाखहून अधिक आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे या 10 राज्यांमधील असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले - ज्या राज्यांमध्ये टेस्टिंग रेट कमी आहे तिथे सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे. त्यामुळे टेस्ट करण्याची क्षमता वाढवण्याची गरज आहे. बिहार, उत्तर प्रदेश, प. बंगाल, तेलंगणा गुजरात राज्यांना अजूनही टेस्टची संख्या वाढवण्याची गरज असल्याचं समोर आलं आहे. - देशात कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण जगातील इतर देशांच्या तुलनेत आधीही कमी होतं आणि आताही सर्वात कमी आहे. काय आहे 72 तासांचा फॉर्म्युला? कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करताना 72 तासांचा फॉर्म्युला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते 72 तासांत एखाद्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आपण अनेक जीव वाचवू शकतो. जो व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे त्याच्या भोवतालचे किंवा संपर्कात आलेल्या व्यक्तींची 72 तासांत टेस्ट करणं आवश्यक आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोनाच्या संसर्गाचा विस्फोट झाला होता. चाचण्यांचं प्रमणात वाढवल्यामुळे कोरोनाचा धोका कमी झाला आहे.  
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, PM narendra modi, Uddhav thacakrey

    पुढील बातम्या