पंतप्रधान मोदी 'मन की बात'मध्ये लॉकडाऊनसंदर्भात काय बोलणार?

पंतप्रधान मोदी 'मन की बात'मध्ये लॉकडाऊनसंदर्भात काय बोलणार?

देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग आणखीन वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला सहकार्य करण्याचं आज पुन्हा एकदा आवाहन करू शकतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. जवळपास 25 हजाराच्या जवळपास कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता 'मन की बात' या कार्यक्रमातून रेडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनतेसोबत संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदींनी याची माहिती ट्वीट करून दिली आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी पुन्हा कोरोना आणि लॉकडाऊनसंदर्भात जनतेसोबत संवाद साधू शकतात. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मे रोजी संपणार आहे. मन की बात संदर्भात त्यांनी 12 एप्रिलला ट्वीट केलं होतं आणि लोकांकडून सूचना मागवल्या होत्या. या सूचनांसदर्भातही आज ते आपल्या मन की बातमध्ये बोलणार आहेत.

देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग आणखीन वाढू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला सहकार्य करण्याचं आज पुन्हा एकदा आवाहन करू शकतात. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात यावं. लॉकडाऊनचे नियम घालून दिले आहेत ते पाळावेत यासंदर्भात आवाहन करणार आहेत. शुक्रवारी उशिरा गृहमंत्रालयाकडून आलेला दुकानं उघडण्याचा आदेश यासंदर्भातही बोलण्याची शक्यता आहे.

कोविड-19 विरोधात पंतप्रधान मोदींसह उच्च स्तरीय समिती काम करत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशात सध्य कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशातही संसर्ग वेगानं पसरत आहे. पंतप्रधान मोदींनी ज्या सूचना मागवल्या आहेत त्यावरही काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

हे वाचा-PM नरेंद्र मोदी कुठला मास्क वापरतात माहित आहे का? कंपनी आणि किंमतही आहे खास

हे वाचा-कोरोनाच्या काळात मेक इन इंडिया, गुजरातमध्ये तयार करण्यात आलं स्वदेशी PPE किट

हे वाचा-हद्द झाली राव! हाय कोर्टासमोर वकील बनियानवर सुनावणीला हजर, न्यायाधीशांनी फटकारले

 

First published: April 26, 2020, 7:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading