मराठी बातम्या /बातम्या /देश /

32 दिवसात भारतात असा पसरत गेला कोरोना, धक्कादायक आकडेवारी आली समोर

32 दिवसात भारतात असा पसरत गेला कोरोना, धक्कादायक आकडेवारी आली समोर

भारतात 3 हजार 374 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 77 लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात 3 हजार 374 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 77 लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात 3 हजार 374 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 77 लोकांचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 05 एप्रिल : कोरोनाची प्रसार भारतात वाढत आहे. रुग्णांची आणि मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या भारतात 3 हजार 374 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 77 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं भारतात सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. 21 दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार आहे, मात्र भारतातील वाढती रुग्णांची संख्या पाहता हा काळ वाढवला जाऊ शकतो.

भारतात 30 जानेवारी रोजी पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळून आला. त्यानंतर आता तब्बल कोरोनाची संख्या तिपटीने वाढली आहे. सुरुवातीला केवळ विदेशातून परतलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र आता हळुहळु क्लस्टर आउटब्रेक आणि संपर्कातून संक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेने रुग्णांचा आकडा कमी दिसत असला तरी, त्यात होणारी वाढ ही भारतासाठी धोक्याची आहे. भारत अजूनही दुसऱ्या टप्प्यात आहे.

वाचा-कोरोनाच्या संकटात चुकीचे मेसेज पाठवणं पडलं महागात; 14 जणांना अटक, 3 वर्षांची शिक्षा

भारतात कोरोनाच्या रुग्णांची वाढ ही गेल्या महिन्याभरात सर्वात जास्त झाली. 30 जानेवारी ते 2 मार्च या कालावधीत भारतात केवळ 5 कोरोनाचे रुग्ण होते. मात्र पुढच्या 8 दिवसात ही संख्या 50 झाली. तर, एका महिन्यात ही संख्या 2500पर्यंत पोहचली. त्यामुळं 2 मार्च ते 2 एप्रिल या 30 दिवसात भारतात तब्बल 2495 रुग्णांची वाढ झाली. तर, 2 दिवसात एक हजारहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली. ही आकडेवारी भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याचे कारण म्हणजे लॉकडाऊनच्या काळात ही संख्या झपाट्याने वाढत असल्याच, लॉकडाऊननंतर यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

वाचा-या लढवय्यांना सलाम! 250 किमी प्रवास करून रुग्णसेवा करण्यासाठी पोहोचली 8 महिन्यांची गर्भवती नर्स

वाचा-अस्सलाम अलैकुम! 'आम्हाला तुमचा अभिमान', पाकने केले Air Indiaचे कौतुक

महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण

भारताने एकीकडे 3000चा आकडा पार केला असताना, महाराष्ट्र राज्यात रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा सतत वाढणारा आकडा आता 661वर गेला आहे. राज्यात आज एकूण 26 नवे रुग्ण आढळले आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. यात मुंबईत तब्बल 377 रुग्ण आहेत.

वाचा-फळांवर थुंकी लावून विकणाऱ्याचा VIDEO व्हायरल, पोलिसांनी केली कडक कारवाई

तबलिगी कार्यक्रमामुळे कोरोनाचा धोका वाढला

देशातील कोरोना पॉझटिव्ह रुग्णांमध्ये तब्बल 30 टक्के रुग्ण हे तबलिगीच्या कार्यक्रमात सहभागी किंवा सदस्यांच्या संपर्कात आल्यामुळे वाढले आहेत. याशिवाय गेल्या 24 तासांत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन तबलिगी मकरझ जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 22000 जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. गेल्या 24 तासांत 9000 पासून 22000 नागरिकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तबलिगी जमातच्या कार्यक्रमानंतर क्वारंटाइनच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

First published:

Tags: Corona