पाकिस्तानमध्ये कोरोनाचं थैमान, 24 तासांमध्ये भारतापेक्षाही जास्त रुग्ण आढळले

पाकिस्तानमध्ये कोरोनाचं थैमान, 24 तासांमध्ये भारतापेक्षाही जास्त रुग्ण आढळले

भारतानंतर आता पाकिस्तानातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मार्च : कोरोना व्हायरसने जगभरातील अनेक देशांमध्ये शिरकाव केला आहे. चीनपासून सुरू झालेल्या या व्हायरसचं मुख्य केंद्र आता युरोप झालं आहे. मात्र त्याचवेळी आशियातील देशांनाही या कोरोना व्हायरसची चिंता भेडसावत आहे. भारतानंतर आता पाकिस्तानातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधित रुण्यांची संख्या आता 186 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांमध्येच पाकिस्तानमध्ये या व्हायरसने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याचं पाहायला मिळालं. कोरोना बाधित रुग्णामध्ये 24 तासांत तब्बल 131 जणांची भर पडली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानमधील केसेस या भारतापेक्षाही जास्त झाल्या आहेत. भारतात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह 114 रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, चीननंतर कोरोना विषाणूमुळे इटली, इराण आणि स्पेनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इटलीमध्ये दिवसभरात 368 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे इटलीमध्ये मृतांची संख्या आता 1,809 वर पोहचली आहे. तर, इराणमध्ये गेल्या 24 तासांत 113 जणांचा मृत्यू झाला असून एक हजाराहून अधिक संसर्ग झाल्याची नोंद आहे.

हेही वाचा-आनंदाची बातमी, कोरोनाला दूर ठेवण्यात महाराष्ट्रातील 442 जण ठरले यशस्वी!

सध्या इटली, इराण आणि स्पेनमधील परिस्थिती चिंताजनक आहे. इराणमधील मृतांची संख्या वाढून 724 झाली आहे. तर दुसरीकडे स्पेनमध्ये एका दिवसात 105 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्पेनमध्ये दोन आठवड्यांची आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. मृतांचा आकडा 14 झाला आहे. या विषाणूमुळे आतापर्यंत जगभरात सहा हजारहून अधिका लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 1 लाख 59 हजार 844 संसर्गित असल्याचे आढळले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2020 07:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading