नवी दिल्ली, 15 मे : देशभरात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 81 हजार 970 झाला आहे. यातील 51 हजार 401 केस या गंभीर आहेत. आज केंद्रीय आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशभरात 2649 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 27 हजार 919 लोकं निरोगी होऊन घरी परतली आहे. एकूण रुग्णांपैकी 111 रुग्ण परदेशी आहेत. शुक्रवारी जाहीर केलेल्या आकड्यांमध्ये गेल्या 24 तासांत भारतात 3967 रुग्णांची नोंद झाली आहे.
अशी आहे राज्यांची आकडेवार
आतापर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर 33, आंध्र प्रदेश 2205, अरुणाचल प्रदेश 1, आसाम 87, बिहार 994, चंडीगढ 191, छत्तीसगढ 60, दादर -नगर हवेली 1, दिल्ली 8470, गोवा 14, गुजरात 9591, हरियाणा 818, जम्मू-कश्मीर 983, झारखंड 197, कर्नाटक 987, केरल 560, लडाख 43, मध्य प्रदेश 4426, महाराष्ट्रात 27 हजार 524, मणिपुर 3, मेघालय 13, मिजोरम 1, ओडिशा 611, पुद्दुचेरी 13, पंजाब 1935, राजस्थान 4534, तमिळनाडु 9674, उत्तराखंड 78, उत्तर प्रदेश 3902 आणि पश्चिम बंगाल 2377, त्रिपुरा156, तेलंगणा 1414 तर हिमाचल प्रदेशमधून 59 प्रकरणं समोर आली आहेत.
वाचा-24 तासांत कोरोनाचं क्रेंद्र झाली मुंबई! प्रत्येक तासाला होतोय एकाचा मृत्यू
Spike of 3967 #COVID19 cases & 100 deaths in India, in last 24 hours. Total positive cases in the country is now at 81970, including 51401 active cases, 27920 cured/discharged/migrated cases and 2649 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/63yDyjOXBI
— ANI (@ANI) May 15, 2020
वाचा-सलग दुसऱ्या दिवशी दोन मोठे अपघात, 3 मजुरांचा जागीच मृत्यू 44 जखमी
महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार
देशात कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रसार वेगानं होत आहे. देशातील कोरोनामुळं सगळ्यात जास्त प्रभावित राज्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. तर, मुंबईची स्थिती आणखी वाईट आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 998 नवीन प्रकरणं सापडली आहेत. तर, 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा पाहून मुंबईत प्रत्येक तासाला एकाचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आलं आहे. एकट्या मुंबईत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 19 हजार 579 आहे. तर 621 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही मोठ्या वेगानं कोरोनाचा प्रसार होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 27 हजारहून अधिक आहे. गेल्या तासांत सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1019 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि मालेगाव येथे 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात.
वाचा-COVID-19: सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल, आता 24 तासांत होणार 1200 सॅम्पल टेस्ट