आता 'या' राज्यात तब्बल 1 वर्ष पाळावे लागणार कोरोनाचे नियम, मास्क-सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक

आता 'या' राज्यात तब्बल 1 वर्ष पाळावे लागणार कोरोनाचे नियम, मास्क-सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक

देशातील एका राज्यानं तब्बल एका वर्षासाठी कोव्हिड-19च्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. यात लोकांचा मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत.

  • Share this:

केरळ, 06 जुलै : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रशियाला मागे टाकत भारत आता एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. यातच देशातील एका राज्यानं तब्बल एका वर्षासाठी कोव्हिड-19च्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. यात लोकांचा मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहे, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. केरळ सरकारने वाढत्या कोरोनाबाधितांची आकडेवारी लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे.

आदेशानुसार लोकांना घरा बाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक असेल . सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या जागा, सर्व प्रकारच्या गाड्या आणि परिवहन सेवेमध्ये मास्क आवश्यक असेल. सर्व लोकांना आपापसांत सहा फूटांचे अंतर पाळावे लागणार आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

वाचा-कोरोनानंतर आता 'या' भयंकर आजाराचे संकट, चीनमध्ये हाय अलर्ट जारी

तसेच, लग्न समारंभात 50 हून अधिक लोकांची उपस्थिती दंडात्मक असेल. अशा कार्यक्रमात, स्वच्छतेबरोबर फेस मास्क लावणे आणि सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांना आयोजकांमार्फत सॅनिटायझर दिले जाईल.

अंत्यसंस्कारासाठीही असेच नियम बनविण्यात आले आहेत. अशा कार्यक्रमात 20 पेक्षा जास्त लोक भाग घेऊ शकणार नाहीत. प्रत्येकाला फेस मास्क लावावा लागेल. कोरोनामुळे एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर त्याचे अंत्यसंस्कार हे केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले जातील.

वाचा-भारताची ‘कोरोना लस’ केव्हा येणार? वादावर सरकारनेच खोडला ICMRचा हा दावा

नवीन आदेशात असे म्हटले आहे की, कोणतेही मोठे मेळावे आयोजित केले जाणार नाही. केवळ 10 लोकं उपस्थित राहतील, असेच कार्यक्रम आयोजित करावेत. यातही लोकांना फेस मास्क, सामाजिक अंतर आणि स्वच्छता यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. दुकाने उघडतील पण दुकानांच्या आकारमानानुसार लोक एकत्र येऊ शकतील. एका वेळी 20 पेक्षा जास्त लोक एकत्र होणार नाहीत. जे दुकानात उभे राहतील त्यांना आपापसात 6 फूट अंतर राखून ठेवावे लागेल.

वाचा-एका दिवसाचे 1 लाख रुपये; बिल भरलं नाही म्हणून कोरोना योद्ध्याला ठेवलं ओलीस

संपादन-प्रियांका गावडे.

First published: July 6, 2020, 8:15 AM IST

ताज्या बातम्या