देशात कोरोनाचा उद्रेक! 24 तासांत 62 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

देशात कोरोनाचा उद्रेक! 24 तासांत 62 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे.

  • Share this:

मुंबई, 10 ऑगस्ट : भारतात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. 1 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं समोर येत आहे. सलग चौथ्या दिवशीही 60 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाख 15 हजार 075 वर पोहोचली आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 1,007 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 6 लाख 15 हजार 945 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे. तर 15 लाख 35 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 44, 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जगभरातील कोरोना आकडेवारीचा विचार करता अमेरिका आणि ब्राझिलनंतर भारताचा क्रमांक लागतो. भारतात सर्वाधिक कोरोनाची संख्या महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात आहे.

हे वाचा-प्रतीक्षा संपली! दोन दिवसांत नोंदवली जाणार जगातली पहिली कोरोना लस

केंद्रीय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 6 लाख 34 हजार 945 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 15 लाख 35 हजार 744 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. बिहार, महाराष्ट्रात कोरोनाच्या संक्रमाणाचा वेग जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. झारखंडमध्येही 18 हजारहून अधिक कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला आहे.

रविवारी महाराष्ट्राशिवाय तामिळनाडूमध्ये 119, कर्नाटकात 107, आंध्र प्रदेशात 97, पश्चिम बंगालमध्ये 54, उत्तर प्रदेशात 41, गुजरातमध्ये 25,, पंजाबमध्ये 24, ओडिशा 19 , दिल्ली आणि जम्मूमध्ये 13 कोरोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 10, 2020, 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading