कोरोनाची रेकॉर्डब्रेक आकडेवारी, देश पुन्हा लॉकडाऊनच्या वाटेवर

कोरोनाची रेकॉर्डब्रेक आकडेवारी, देश पुन्हा लॉकडाऊनच्या वाटेवर

कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 13 जुलै: देशात कोरोनामुळे नागरिकांच्या मनात काहीसं भीतीचं वातावरण आहे. एकीकडे रिकव्हरी रेट चांगला असला तरीही दर दिवसाला जवळपास 23 हजारहून अधिक नवीन कोरोनाच्या केसेस सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या जवळपास 9 लाखाच्या आसपास आहे. 24 तासांत 29 हजारहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 2.66 टक्के तर बरे होणाऱ्यांची टक्केवारी 63 वर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे संक्रमण रोखण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे.

हे वाचा-मोठी बातमी : आज मध्यरात्रीपासून पुण्यात कडक लॉकडाऊन; केवळ या सेवा राहतील सुरू

उत्तर प्रदेश राज्य सरकारने शनिवारी, रविवारी संपूर्ण राज्यात कडक निर्बंध घातले असून दोन दिवस लॉकडाऊनची घोषणा केली होती. याआधी कर्नाटक आणि तामिळनाडू यांनी रविवारी लॉकडाऊन केलं. आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि बिहारसारख्या राज्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये लॉकडाऊन केलं आहे. 14 जुलैपासून सात दिवस बेंगळुरूमध्ये संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर महाराष्ट्रातही पुणे, ठाणे-डोंबिवलीसह काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 13, 2020, 8:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading