Home /News /national /

COVID-19: 12 राज्यातल्या 22 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांपासून नवा रुग्ण नाही, पहा यादी

COVID-19: 12 राज्यातल्या 22 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांपासून नवा रुग्ण नाही, पहा यादी

ब्रझीलमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 40,91,801 एवढी असून 1,25, 500 जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रझीलमध्ये कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 40,91,801 एवढी असून 1,25, 500 जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 991 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 43 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 14,378वर गेला आहे.

  नवी दिल्ली 19 एप्रिल: देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. असं असलं तरी काही दिलासादायक घटना घडत आहेत. देशातल्या 12 राज्यांमधल्या 22 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नाही अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या 24 तासांमध्ये 991 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 43 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 14,378वर तर मृत्यूचा आकडा 480वर गेला आहे. यात 4,291 जण हे तबलिगी जमातशी संबंधीत असल्याचंही त्यांनी सांगितलं. हे आहेत ते देशातले 22 जिल्हे बिहार - लखीसराय, गोपालगंज आणि भागलपूर राजस्‍थान -  धौलपूर आणि उदयपूर जम्‍मू कश्‍मीर - पुलवामा मणिपुर - तोबल कर्नाटक - चित्रदुर्गा पंजाब - होशियारपुर हरियाणा - रोहतक आणि चरखी दादरी अरुणाचल प्रदेश - लोहित ओडिशा - पुरी आणि भद्रक आसम - करीमगंज, गोलाघट, कामरूप ग्रामीण, नलबारी आणि दक्षिण सलमारा पश्चिम बंगाल - जलपाइगुड़ी आणि कलीमपोंग आंध्र प्रदेश - विशाखापटन्नम्

  नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय, चीनी कंपन्यांना बसणार दणका

  कर्नाटकातल्या कोडागू जिल्ह्यात मागच्या 28 दिवसांपासून नवा रुग्ण नाही. तर दिल्‍ली, तेलंगना, महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्‍तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात सर्वात जास्त रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाव्हायरस (Coronavirus Lockdown2.0) रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सरकारने ग्रामीण भागात आणखी काही दिलासा दिला आहे. आता सहकारी संस्था त्यांचे काम कमी कर्मचार्‍यांसह सुरू करू शकेल. या व्यतिरिक्त अनुसूचित जमाती व वनक्षेत्रात राहणाऱ्या लोकांकडून छोट्या वनोपयोगी व जंगली जंगलातील वन उत्पादनांचे संकलन, काढणी व प्रक्रिया करण्यास गृह सरकारने सूट दिली आहे.

  राष्ट्रपती भवन परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाचा कोरोनामु मुत्यू

  सरकारकडून नवीन सूट - बांबू, नारळ, सुपारी, कोको आणि मसाल्यांच्या लागवडीपासून, कापणी, प्रक्रिया, पॅकेजिंग, विक्री तसेच लॉकडाऊनमधून होणार्‍या व्यवहारांना सरकारने सूट दिली आहे. सहकारी पतसंस्था - सहकारी पतसंस्था आणि ग्रामीण भागात येणार्‍या बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांसह या कामांना सूट देण्यात आली असून त्यांना किमान कर्मचार्‍यांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील बांधकाम कामांना 20 एप्रिलपासून सूट देण्यात येईल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, वीज व दळणवळणाशी संबंधित प्रकल्प व उपक्रमांनाही लॉकडाउनमधून सूट देण्यात आली आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या